प्रिमिअम स्मार्टफोन कंपनी वनप्लस भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा डबल धमाका करण्याची तयारी करत आहे. येत्या ८ जुलैला वनप्लस दोन फोन लाँच करणार आहे. काही महिन्यांपूर्वीच वनप्लसने १३ सिरीज लाँच केली होती. यानंतर आता काहीशी स्वस्तातील सिरीज लाँच करणार आहे.
कंपनीने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. यामध्ये वनप्लस नॉर्ड सिरीज लाँच होणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. यानुसार वनप्लस नॉर्ड ५ आणि वनप्लस नॉर्ड सीई ५ हे फोन असणार आहेत. रिपोर्टनुसार या फोनमध्ये वनप्लस १३ सिरीजमध्ये वापरलेला कॅमेरा देण्यात येणार आहे. यामुळे चांगल्या कॅमेरावाला फोन ज्यांना बजेटमध्ये हवा आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
वनप्लसच्या नॉर्ड ५ मध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार आहे. १३ सिरीजमध्ये सोनीचा एलवायटी ७०० हा कॅमेरा वापरण्यात आला होता. तोच यामध्ये देण्यात आला आहे. याचबरोबर लेटेस्ट प्रोसेसरही या फोनमध्ये मिळणार आहे. याचबरोबर ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील दिला जाणार आहे. याचबरोबर फास्ट चार्जिंगसाठी ८० किंवा १०० वॉटचा चार्जर सपोर्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. तसेच आतापर्यंतच्या वनप्लसच्या मोबाईलपेक्षा जास्त मोठी बॅटरी देखील दिली जाण्याची शक्यता आहे.
याचबरोबर 144Hz रिफ्रेश रेटचा सहा इंचापेक्षा मोठा डिस्प्ले जो AMOLED असू शकतो, दिला जाण्याची शक्यता आहे. परफॉर्मन्ससाठी स्नैपड्रैगन 8s Gen- चा प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच ८-१२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीपर्यंतची स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते. किंमतीबाबत अंदाज लावायचा झाल्यास नॉर्ड ५ ३०-३५ हजाराच्या आत तसेच नॉर्ड सीई ५ हा २०-२५ हजारांच्या आत उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.