OnePlus चा स्वस्त फोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; 12GB RAM सह येईल बाजारात
By सिद्धेश जाधव | Updated: December 20, 2021 16:37 IST2021-12-20T15:56:04+5:302021-12-20T16:37:00+5:30
OnePlus Nord 2 CE: वनप्लस नॉर्ड 2 सीई स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर सर्टिफाइड झाला आहे. या लिस्टिंगमुळे फोनचा देशातील लाँच नजीक असल्याचं समजतं.

OnePlus चा स्वस्त फोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; 12GB RAM सह येईल बाजारात
गेले कित्येक दिवस OnePlus च्या आगामी OnePlus Nord 2 CE च्या बातम्या येत आहेत. हा फोन कंपनीचा आगामी 5G फोन असेल जो मिड रेंजमध्ये सादर केला जाईल. याआधी आलेल्या बातमीनुसार, हा 2022 मध्ये भारतात येणारा कंपनीचा पहिला फोन असेल. आता वनप्लस नॉर्ड 2 सीई स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर सर्टिफाइड झाला आहे. या लिस्टिंगमुळे फोनचा देशातील लाँच नजीक असल्याचं समजतं.
OnePlus Nord 2 CE स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. इथून या फोनच्या IV2201 मॉडेल नंबर व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. कंपनीनं देखील फोनच्या लाँच डेट किंवा स्पेसिफिकेशन्सची माहिती दलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा मोबाईल जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान भारतीयांच्या भेटीला येईल. देशात OnePlus Nord 2 CE ची किंमत 28,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
OnePlus Nord 2 CE चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord 2 CE मध्ये 6.4 इंचाच मोठा अॅमोलेड डिस्प्ले मिळेल. हा पंच-होल डिजाईनसह येणारा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह सादर केला जाईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएसवर चालेल. यात मीडियाटेक डिमेनसिटी 900 5G चिपसेटची ताकद मिळू शकते. त्याचबरोबर 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड 2 सीई मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. हा फोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येईल. यातील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
हे देखील वाचा:
सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास
Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स