OnePlus Nord 2 5G: 3,000 रुपयांच्या डिस्काउंटवर घरी आणा 12GB RAM असलेला 5G Phone; OnePlus नं केली ऑफर्सची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Published: December 7, 2021 12:42 PM2021-12-07T12:42:31+5:302021-12-07T12:43:39+5:30

OnePlus Nord 2 5G: OnePlus Nord 2 5G Phone ची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे. 12GB RAM, 50MP Camera, 32MP Selfie Camera आणि 65W फास्ट चार्जिंग असलेला हा फोन OnePlus.in आणि Amazon वर उपलब्ध आहे.  

Oneplus nord 2 5G phone price in india cheaper by up to rs 3000 new price and features  | OnePlus Nord 2 5G: 3,000 रुपयांच्या डिस्काउंटवर घरी आणा 12GB RAM असलेला 5G Phone; OnePlus नं केली ऑफर्सची घोषणा 

(सौजन्य: fonearena)

googlenewsNext

OnePlus Nord 2 5G Phone स्मार्टफोन कंपनीनं यावर्षी जुलैमध्ये भारतात सादर केला होता. या फोनमध्ये कंपनीनं मिडरेंजमध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर देऊन प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर दिली आहे. आता या स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर Amazon आणि OnePlus.in वर उपलब्ध आहे.  

OnePlus Nord 2 price in India 

OnePlus Nord 2 चे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त OnePlus.in वरून 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनवर ICICI Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा डिस्काउंट मिळत आहे. 29,999 रुपयांचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 34,999 रुपयांच्या ऐवजी 32,999 रुपये द्यावे लागतील.  

तसेच काही दिवसांपूर्वी आलेल्या Nord 2 PAC-MAN Edition वर देखील कंपनीनं डिस्काउंटची घोषणा केली आहे. या फोनच्या एकमेव 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलवर 3,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे 37,999 रुपयांचा हा फोन आता 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या ऑफरचा फायदा 31 डिसेंबर 2021 पर्यंत घेता येईल. 

OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन्स    

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 6.43-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच कारतण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1800 पिक्सल रिजोल्यूशनसह आला आहे. या फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90हर्ट्ज आहे. हा वनप्लस फोन अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजन ओएस 11.3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 एआय चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी OnePlus Nord 2 5G मध्ये एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो.    

फोटोग्राफी सेगमेंट पाहता, OnePlus Nord 2 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योटिरीसाठी OnePlus Nord 2 5G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे दोन्ही फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65W वॉर्प चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.   

Web Title: Oneplus nord 2 5G phone price in india cheaper by up to rs 3000 new price and features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.