शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"; खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 15:50 IST

Oneplus nord 2 5g blasted : अवघ्या दहा दिवसांपूर्वी वनप्लसचा नवा फोन घेतला होता. मात्र अचानक काम करत असताना त्याच्या खिशातून धूर आला आणि फोनचा मोठा स्फोट झाला.

नवी दिल्ली - OnePlus Nord सीरीजच्या फोनमध्ये सातत्याने स्फोट होत असल्याची घटना समोर येत आहे. ऑगस्टमध्ये वनप्लस नॉर्ड 2 फुटल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा OnePlus Nord 2 5G च्या फोनचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. गौरव गुलाटी यांनी अवघ्या दहा दिवसांपूर्वी नवा फोन घेतला होता. मात्र अचानक काम करत असताना त्याच्या खिशातून धूर आला आणि फोनचा मोठा स्फोट झाला. यामध्ये थोडक्यात गुलाटी यांचा जीव वाचला आहे. पण ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

गौरव गुलाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काम करत असताना अचानक त्यांच्या खिशातून धूर येऊ लागला आणि काही समजायच्या आतच वनप्लसच्या फोनचा भीषण स्फोट झाला. पोट, कान आणि डोळ्याला या स्फोटामुळे गंभीर दुखापत झाली आहे. तर फोनमधून आलेल्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच गौरव यांनी वनप्लसच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच स्फोट झाल्यानंतर फोनची नेमकी कशी अवस्था झालीय याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. 

"वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट"

वनप्लसच्या फोनचा स्फोट झाल्यानंतर गौरव यांनी कंपनीशी संपर्क केला. तेव्हा कंपनीच्या वतीने एक व्यक्ती भेटायला आली. त्यांनी इन्वेस्टिगेशनसाठी फोन आपल्या सोबत नेण्याची विनंती केली. पण गौरव यांनी पोलीस केस असल्याने फोन देण्यास नकार दिला. वनप्लसचा फोन म्हणजे डेथ सर्टिफिकेट. हा फोन खिशात ठेवून मी डेथ सर्टिफिकेट घेऊन फिरत होतो असं देखील गौरव यांनी म्हटलं आहे. तसेच थोडक्यात जीव वाचल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

अवघ्या दहा दिवसांपूर्वीच घेतला होता नवा फोन

गौरव यांनी वनप्लस नॉर्ड 2 5G अवघ्या दहा दिवसांपूर्वीच घेतला होता. दोन- तीन दिवसांपासूनच गौरव यांनी नव्या फोनचा वापर करण्यास सुरुवात केली होती. फोनचा स्फोट झाला तेव्हा बॅटरी जवळपास 90 टक्के चार्ज होती. स्फोट झालेल्या फोनचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी देखील काही महिन्यांपूर्वी वनप्लसच्या फोनचा स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. 

 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलBlastस्फोटdelhiदिल्लीIndiaभारत