OnePlus चाहत्यांच्या वाट्याला अजून एक अपेक्षाभंग! OnePlus 9T यावर्षी होणार नाही लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: July 28, 2021 04:03 PM2021-07-28T16:03:01+5:302021-07-28T16:04:38+5:30

Oneplus 9t may not launch: टिप्सटर Max Jambor ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी OnePlus 9T स्मार्टफोन यावर्षी लाँच करणार नाही.

Oneplus 9t may not launch this year according to leak  | OnePlus चाहत्यांच्या वाट्याला अजून एक अपेक्षाभंग! OnePlus 9T यावर्षी होणार नाही लाँच  

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

Next

फ्लॅगशिप किलर म्हणून OnePlus ने टेक मार्केटमध्ये प्रवेश केला होता, परंतु आता ही कंपनी प्रीमियम स्मार्टफोन बनवत आहे. दरवर्षी कंपनी आपल्या दोन फ्लॅगशिप सीरिज लाँच करते. यावर्षी OnePlus 9 सीरिजनंतर OnePlus 9T येणार होती. त्यामुळे 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत OnePlus 9T स्मार्टफोन लाँच होणे अपेक्षित होते. परंतु, एका विश्वसनीय टिपस्टरनुसार, कंपनी यावर्षी OnePlus 9T लाँच करणार नाही.  (Oneplus 9t may not launch this year)

दरवर्षी कंपनी आपल्या फ्लॅगशिप लाइनअपनंतर अपग्रेडेड टी-सीरीजचे स्मार्टफोन लाँच करते. या सीरीजमध्ये आतापर्यंत OnePlus 5T, 6T, 7T, आणि 8T असे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. परंतु विश्वसनीय टिप्सटर Max Jambor ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी OnePlus 9T स्मार्टफोन यावर्षी लाँच करणार नाही. मॅक्सने याबाबत जास्त माहिती दिली नाही, परंतु स्पष्टपणे OnePlus 9T यावर्षी लाँच होणार नाही, असे सांगितले आहे. गेल्याच आठवड्यात कंपनीने भारतात वनप्लस नॉर्ड 2 5Gस्मार्टफोन लाँच केला होता.  

OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन्स   

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 6.43-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच कारतण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1800 पिक्सल रिजोल्यूशनसह आला आहे. या फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90हर्ट्ज आहे. हा वनप्लस फोन अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजन ओएस 11.3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 एआय चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी OnePlus Nord 2 5G मध्ये एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो.   

फोटोग्राफी सेगमेंट पाहता, OnePlus Nord 2 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योटिरीसाठी OnePlus Nord 2 5G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे दोन्ही फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65W वॉर्प चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.    

Web Title: Oneplus 9t may not launch this year according to leak 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.