शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

OnePlus 9 सीरिजचे स्मार्टफोन्स २३ मार्चला होणार लाँच; याचा कॅमेरा आणि 'नासा'चा संबंध माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 18:38 IST

OnePlus 9 Series : जबरदस्त कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

ठळक मुद्देजबरदस्त कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लवकरच होणार लाँचयामध्ये कंपनीनं Hasselblad च्या कॅमेऱ्याचा वापर केला आहे.

दिग्गज स्मार्टफोन कंपनी OnePlus चे 9 सीरिजचे स्मार्टफोन्स लवकरच लाँच होणार आहेत. कंपनीनं याची घोषणा केली असून 23 मार्च रोजी हे स्मार्टफोन्स लाँच केले जातील. एका ग्लोबल इव्हेंटमध्ये या सीरिजचे स्मार्टफोन्स लाँच केले जातील. तसंच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता हे लाँच इव्हेंट सुरू होईल, OnePlus 9 सीरिजसह कंपनी OnePlus Watch देखील लाँच करण्याची शक्यता आहे. लाँचच्या तारखेव्यतिरिक्त कंपनीनं या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. OnePlus 9 या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Hasselblad कंपनीचा कॅमेरा असणार आहे. Hasselblad आणि नासानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं याचा खुप जवळचा संबंध आहे. कारण त्यावेळी Hasselblad कंपनीच्या कॅमेऱ्यानंच चंद्रावरील फोटो काढण्यात आले होते. दरम्यान, आपल्या स्मार्टफोन्सच्या कॅमेऱ्याला अधिक उत्तम बनवण्यासाठी OnePlus पुढील तीन वर्षांमध्ये 150 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार कंपनी OnePlus 9 सीरिजचे तीन मॉडेल्स लाँच करू शकते. याणध्ये OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus9e या स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो. तसंच या स्मार्टफोन्ससोबत चार्जरही देण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. असा असेल कॅमेराकंपनीनं दिलेल्या माहितीनुसार OnePlus 9 सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये 140 डिग्रीच्या फ्लिल्ड ऑफ व्ह्यूसोबत पॅनोरमिक कॅमेरा, तसंत फ्रन्ट फेसिंग कॅमेऱ्यात तेजीनं फोकस करण्यासाठी T-Lens टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय या स्मार्टफोन्समध्ये अल्ट्रा वाईड फोटोंसाठी विशेष लेन्स देण्यात आली आहे. व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर Hasselblad कॅमेरा उत्तम HDR व्हिडीओ रेकॉर्डिंग 120FPS वर 4K आणि 30FPS वर 8K व्हिडीओ रकॉर्डिंग सपोर्ट करेल.  

याशिवाय फोनमध्ये नवा Hasselblad Pro Mode देखील असेल. यामुळे युझर्सना नवा इंटरफेस आणि कॅमेऱ्यावर अधिक कंट्रोल मिळेल. दरम्यान, OnePlus चा प्रायमरी कॅमरा Sony IMX789 सेन्सर असेल. हा पहिल्यापेक्षा 64 टक्के अधिक कलरफुल असेल असा दावा कंपनीनं केला आहे. या शिवाय फोटोमध्ये अधिक डायनॅमिक आणि वायब्रंट कलर्स पाहायला मिळतील.कॅमेरा आणि नासाचा काय संबंध ?

चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. त्याआधी म्हणजेच 18 जुलै 1969 ला नासाच्या यानाने चंद्राकडे झेप घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे या सुवर्ण महोत्सवी वर्षाला नासाने रोमांचकारी असे 400 फोटो प्रसिद्ध केले होते. चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले? नील आर्मस्ट्राँगने. पण या नील आर्मस्ट्राँगसोबत आणखी दोघेजण या मोहिमेवर होते. आर्मस्ट्राँग यांनी पहिले पाऊल ठेवले, पण दुसरे पाऊल कोणी ठेवले याबाबत माहिती नसेल. या व्यक्तीचे नाव होते एल्ड्रिन. चंद्रावर पाऊल ठेवतानाचा फोटो आर्मस्ट्राँगॉचा नाही तर एल्ड्रिन यांचा आहे. कारण तेव्हा आर्मस्ट्रॉन्गच कॅमेरा हाताळत होते. 

पन्नास वर्षांपूर्वी कोणता कॅमेरा होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तेव्हाच्या उच्च दर्जाच्या Hasselblad कॅमेरामधून हे फोटो काढण्यात आले आहेत. हे कॅमेरे स्वीडनमध्ये बनविले जातात. एल्ड्रिन यांच्या पावलाचे ठसे आजही चंद्रावर आहेत. कारण तेथे वायूमंडळ नाही तसेच पाऊसही पडत नाही. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनNASAनासा