अविश्वसनीय किंमतीत सादर होऊ शकतो OnePlus 9 RT; लाँचपूर्वीच झाला किंमतीचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:12 PM2021-10-06T16:12:28+5:302021-10-06T16:17:18+5:30

OnePlus 9 RT Price In India: OnePlus 9 RT स्मार्टफोनची किंमत 23,200 रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते. 39,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या OnePlus 9R च्या तुलनेत ही किंमत खूप कमी आहे.

OnePlus 9 RT Specs Variants Price leaked before Launch date 15 october  | अविश्वसनीय किंमतीत सादर होऊ शकतो OnePlus 9 RT; लाँचपूर्वीच झाला किंमतीचा खुलासा 

अविश्वसनीय किंमतीत सादर होऊ शकतो OnePlus 9 RT; लाँचपूर्वीच झाला किंमतीचा खुलासा 

Next

वनप्लस मोबाईल आपल्या आगामी OnePlus 9 RT स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनी हा फोन पुढील येत्या 15 ऑक्टोबरला सादर करू शकते. आता या फोनच्या किंमतीची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. समोर आलेल्या लीकनुसार आगामी OnePlus 9 RT स्मार्टफोनची किंमत 23,200 रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते.  

OnePlus 9 RT ची संभाव्य किंमत 

वनप्लस 9 आरटीच्या किंमतीची माहिती प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने लीक केली आहे. या लीकमध्ये हा फोन 2,000 युआनमध्ये सादर केला जाईल असे सांगण्यात आले आहे. ही किंमत 23,200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. लिक्सटरने ही किंमत 3,000 युआन म्हणजे 34,700 रुपयांपर्यंत देखील जाऊ शकते, असे सांगितले आहे. 39,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या OnePlus 9R च्या तुलनेत ही किंमत खूप कमी आहे. परंतु ही फक्त लीक असल्यामुळे ठोस किंमतीची आपल्याला फोनच्या लाँचची वाट बघावी लागेल.  

OnePlus 9 RT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार, OnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असेलला अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. यात अँड्रॉइड ओएस आधारित आक्सिजनओएस 12 सह बाजारात दाखल होईल. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी वनप्लस 9 आरटी मध्ये 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह दिली जाऊ शकते.   

हा मोबाईल लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. गीकबेंचनुसार या फोनमध्ये 1.80गीगाहर्ट्ज बेस आणि 2.84गीगाहर्ट्ज फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. लिस्टिंगमधील कोडनेममधून हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह सादर केला जाईल, असे समजले आहे. वनप्लसच्या या आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये 12GB रॅम मिळेल, या पेक्षा जास्त व्हेरिएंटसह हा फोन बाजारात उपलब्ध होऊ शकतो. 

Web Title: OnePlus 9 RT Specs Variants Price leaked before Launch date 15 october 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.