शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

वन प्लस ५च्या ८ जीबी रॅमचे नवीन व्हेरियंट बाजारपेठेत उपलब्ध

By शेखर पाटील | Published: August 21, 2017 5:35 PM

वन प्लस कंपनीने तब्बल ८ जीबी रॅम असणार्‍या आपल्या वन प्लस ५ या फ्लॅगशीप मॉडेलचे स्लेट ग्रे व्हेरियंट भारतीय ग्राहकांना उपलब्ध केले आहे.

वन प्लस कंपनीने तब्बल ८ जीबी रॅम असणार्‍या आपल्या वन प्लस ५ या फ्लॅगशीप मॉडेलचे स्लेट ग्रे व्हेरियंट भारतीय ग्राहकांना उपलब्ध केले आहे. वन प्लस ५ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत जून महिन्याच्या अखेरीस ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज (मूल्य ३२,९९९ रुपये) व ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य ३७,९९९ रुपये) अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. यापैकी आठ जीबी रॅमच्या मॉडेलला स्पेस ग्रे या रंगाच्या पर्यायात सादर करण्यात आले होते. आता हेच मॉडेल स्लेट ग्रे या रंगात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.२१ ते २५ ऑगस्ट २०१७ दरम्यान वन प्लस ५ चे हे व्हेरियंट ‘अमेझॉन इंडिया’सह कंपनीच्या स्टोअरवरून खरेदीसाठी उपलब्ध राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तर वन प्लस ५ च्या ‘सुपर सेलर वीक’चे औचित्य साधून अमेझॉनने काही आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत. यात ३ ते ६ महिन्यांसाठी विनाव्याजी ईएमआय, अमेरिकन एक्सप्रेस कार्ड तथा अमेझॉन गिफ्ट कार्डसाठी १५०० रूपयांचा कॅशबॅक आदींचा समावेश आहे. व्होडाफोनने या स्मार्टफोन खरेदी करणार्‍यांना ७५ जीबी इतका फोर-जी डाटा मोफत प्रदान करत ‘व्होडाफोन प्ले’ ही सेवाही या कालखंडासाठी देऊ केली आहे. तर ‘कोटक’तर्फे १२ महिन्यांपर्यंतचा मोफत अपघाती विमादेखील संबंधीत युजरला मिळणार आहे. तर या व्हेरियंटसोबत आधी सादर करण्यात आलेले वन प्लस ५चे व्हेरियंट तसेच ६४ जीबी रॅमच्या मॉडेलसाठीही या ऑफर्स असणार आहेत.वन प्लस ५ या मॉडेलमध्ये अतिशय उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१०२० बाय १२८० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी ऑप्टीक अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. याची बॉडी पूर्णपणे मेटलची आहे. याच्या मागच्या बाजूस १६ मेगापिक्सल्ससह २० मेगापिक्सल्सचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या माध्यमातून वन प्लस ५ हा स्मार्टफोन सर्वात उत्तम दर्जाचा ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात २ एक्स इतका ऑप्टीकल झूमदेखील असून यासोबत बोके इफेक्टची सुविधा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर आधारित ऑक्सिजन ओएसवर चालणारा आहे.

वन प्लस ५ मध्ये फोर-जी एलटीई आणि व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी, फिंगरप्रिंट स्कॅनर, प्रॉक्झीमिटी सेन्सर, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास, गायरोस्कोप आदी फिचर्स आहेत.