शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Microsoft मध्ये 'या' भारतीयाकडे मोठी जबाबदारी; Ai टीमचे करणार नेतृत्व...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 19:47 IST

Microsoft News : जय पारीख यांची Microsoft मध्ये महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Microsoft News : टेक जायंट मायक्रोसॉफ्टने थर्ट पार्टी ग्राहकांसाठी Ai ॲप्स आणि टूल्स तयार करण्यासाठी नवीन टीम तयार केली आहे. 'कोअर एआय - प्लॅटफॉर्म अँड टूल्स', असे या टीमला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणझे, या टीमचे नेतृत्व एका भारतीयाच्या खांद्यावर असेल. भारतीय वंशाचे जय पारीख (Jai Parekh) या टीमचे प्रमुख असतील. त्यांनी यापूर्वी सायबर सिक्युरिटी स्टार्टअप लेसवर्कचे सीईओ आणि मेटामध्ये प्रमुख पदावर काम केले आहे. आता मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. 

3 वर्षात 30 वर्षांचा बदलनवीन टीमबाबत सत्या नडेला म्हणाले की, या नवीन बदलामुळे अॅप्लिकेशन कॅटेगरीज प्रभावित होतील. पण, 3 वर्षात 30 वर्षांचा बदल अपेक्षित आहे. दरम्यान, सुमारे 10 महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टने डीपमाइंडचे सह-संस्थापक मुस्तफा सुलेमान यांना कोपायलट एआय मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले होते. आता पारीख सुलेमानसोबत कंपनीत एकत्र काम करणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये रुजूपारीख गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले होते. ते कंपनीच्या सीनिअर टीमचा भाग आहेत. मायक्रोसॉफ्टचे अनेक अधिकारी जय पारीख यांना रिपोर्ट करतील. यामध्ये एआय प्लॅटफॉर्म हेड एरिक बॉयड, एआय इन्फ्रास्ट्रक्चर डेप्युटी सीटीओ जेसन टेलर, मायक्रोसॉफ्ट डेव्हलपर डिव्हिजन हेड ज्युलिया लियसन इत्यादींचा समावेश आहे.

पारीख यांची कारकीर्द व्हर्जिनिया टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेले जय पारीख 2009 मध्ये फेसबुक कंपनीत रुजू झाले. या काळात त्यांनी कंपनीच्या तांत्रिक पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर प्रकल्पांवर काम केले. कंपनी सोडण्यापूर्वी ते इंजीनिअरिंग टीमचे प्रमुख होते. मेटाच्या अक्विला ड्रोन प्रकल्पासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवरही त्यांनी काम केले आहे. यानंतर त्यांनी लेसवर्कचे सीईओ म्हणून काम केले. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाIndiaभारत