शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
4
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
5
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
6
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
7
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
8
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
9
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
10
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
11
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
12
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
13
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
14
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
15
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
16
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
17
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
18
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
20
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

आता Whatsapp वर डाउनलोड होणार DL आणि PAN कार्ड; फक्त एका मेसेजमुळे होईल काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 4:26 PM

Whatsapp : सरकारने डिजिलॉकर (Digilocker) सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध केले आहे.

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) युजर्ससाठी खास सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही फक्त एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि आरसी यासारखे आवश्यक डॉक्युमेंट्स डाऊनलोड करू शकता. सरकारने डिजिलॉकर (Digilocker) सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध केले आहे. म्हणजेच तुम्ही फक्त एका नंबरवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून Digilocker सर्व्हिस वापर करू शकता. 

'हे' डॉक्युमेंट्स करू शकता डाउनलोड ...- पॅनकार्ड- ड्रायव्हिंग लायसन्स- सीबीएसई दहावी पास सर्टिफिकेट- आरसी बुक-  विमा पॉलिसी - दुचाकी- दहावीचे मार्कशीट- बारावीचे मार्कशीट- विमा पॉलिसी डॉक्युमेंट्स (Digilocker वर उपलब्ध जीवन आणि गैर-जीवन)

WhatsApp वर असे करा डाउनलोड आपले डॉक्युमेंट्स...- यासाठी तुम्हाला फक्त +91 9013151515 नंबरवर  Namaste किंवा Hi किंवा Digilocker लिहून पाठवावे लागेल. - यानंतर तुम्हाला DigiLocker अकाउंट किंवा Cowin सर्व्हिस अ‍ॅक्सेस करायचे की नाही हे विचारले जाईल.- DigiLocker निवडल्यावर तुम्हाला विचारले जाईल की खाते आहे की नाही.- जर DigiLocker वर तुमचे आधीच अकाउंट असल्यास, तुमचा आधार नंबर टाका.- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो एंटर करा.- आता तुम्ही जी काही कागदपत्रे आधीच अपलोड केली आहेत, ती तुम्ही येथून डाउनलोड करू शकता.

दरम्यान, MyGov हेल्पडेस्क (ज्याला आधी MyGov कोरोना हेल्पडेस्क म्हणून ओळखले जात होते) मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात या हेल्पडेस्कने लोकांना कोविडशी संबंधित माहिती देण्यापासून, लस बुकिंगची सुविधा, प्रमाणपत्र डाउनलोड करण्यापर्यंत खूप मदत केली आहे. आजपर्यंत 80 मिलियनहून अधिक लोकांनी हेल्पडेस्कवर अ‍ॅक्सेस केला आहे आणि 33 मिलियनहून अधिक लस प्रमाणपत्रे डाउनलोड करण्यात आली आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान