नथिंगची 3A सिरीज लाँच! वेगवेगळ्या किंमतीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:46 IST2025-03-12T15:12:17+5:302025-03-12T16:46:04+5:30
Nothing Phone 3a and Pro news: दोन्ही फोनच्या किंमतीत मोठे अंतर आहे. दोन्ही फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे.

नथिंगची 3A सिरीज लाँच! वेगवेगळ्या किंमतीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स...
काही वर्षांपूर्वीच लाँच झालेल्या नथिंग कंपनीची नवीन सिरीज नुकतीच लाँच झाली आहे. यामध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. Nothing Phone 3a आणि 3a Pro अशी या फोनची नावे आहेत. दोन्ही स्मार्टफोन कंपनीने मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत.
दोन्ही फोनच्या किंमतीत मोठे अंतर आहे. दोन्ही फोनमध्ये समान गोष्टी म्हणजे ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. Nothing Phone 3a ची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होत आहे. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंट आहे. तर २५६ जीबीच्या स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
नथिंग फोन थ्रीए प्रोची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होत आहे. यामध्ये ८/१२ जीबी रॅम आणि १२८, २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. या फोनची किंमत 31,999 रुपयांपर्यंत आहे. दोन्ही स्मार्टफोन ११ मार्चपासून फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आदी ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत.
Nothing Phone 3a फोन खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा...
डिस्प्ले...
नथिंग फोन ३ए आणि फोन ३ए प्रो मध्ये ६.७७-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि पांडा ग्लास प्रोटेक्शन यामध्ये देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७एस जेन ३ प्रोसेसर देण्यात आलेला आहे.
नथिंग थ्रीए प्रो खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा...
कॅमेरा...
फोन ३ए प्रो मध्ये ५० एमपी प्रायमरी लेन्स, ५० एमपी पेरिस्कोप लेन्स आणि ८ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत. ५० एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर नथिंग 3a मध्ये 50MP चा प्रायमरी लेन्स, 50MP चा टेलिफोटो लेन्स आणि 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. ३२ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.