Nokia ची नवीन QLED आणि स्मार्ट टीव्ही रेंज भारतात सादर; फ्लिपकार्टवर होणार खरेदीसाठी उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: September 28, 2021 04:49 PM2021-09-28T16:49:07+5:302021-09-28T16:49:16+5:30

Budget Smart TV Nokia Smart TV: Nokia Smart TV आणि QLED टीव्ही रेंज 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

nokia qled other smart tvs powered by android 11 launched in india | Nokia ची नवीन QLED आणि स्मार्ट टीव्ही रेंज भारतात सादर; फ्लिपकार्टवर होणार खरेदीसाठी उपलब्ध 

Nokia ची नवीन QLED आणि स्मार्ट टीव्ही रेंज भारतात सादर; फ्लिपकार्टवर होणार खरेदीसाठी उपलब्ध 

googlenewsNext

नोकियाचा नवीन लॅपटॉप Nokia PureBook S14, QLED टीव्ही रेंज, स्मार्ट टीव्ही रेंज आणि हेडसेट भारतात सादर करण्यात आले आहेत. या डिवाइसची विक्री 3 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलच्या माध्यमातून करण्यात येईल. या लेखात आपण Nokia smart TV मॉडेल्स आणि QLED रेंजची माहिती घेणार आहोत.  

Nokia Smart TV आणि QLED रेंजची किंमत 

Nokia Smart TV QLED रेंजचे दोन मॉडेल भारतात आले आहेत, ज्यांची डिस्प्ले साईज 50-इंच आणि 55-इंच आहे. या टीव्ही मॉडेलची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होईल. नोकिया स्मार्ट टीव्हीचे चार नवीन मॉडेल्स भारतात आले आहेत. ज्यांची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होईल. या नोकिया टीव्ही मॉडेल्सची विक्री 3 ऑक्टोबरपासून करण्यात येईल.  

Nokia Smart TV मॉडेल्स स्पेसिफिकेशन्स  

नोकियाच्या नव्या Smart TV मॉडेल्समध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. QLED मॉडेल्स 50-इंच आणि 55-इंचाच्या डिस्प्ले साईजसह बाजारात आले आहेत. तर स्मार्ट टीव्ही रेंजमध्ये 43-इंच full-HD, 43-इंच, 50-इंच आणि 55-इंच Ultra HD 4K मॉडेल्ससह समावेश आहे. स्मार्ट टीव्ही मॉडेल्समध्ये JBL स्पीकर देण्यात आले आहेत जे Harman AdioEFX द्वारे ट्यून करण्यात आले आहेत. नोकिया टीव्हीमध्ये 60W पर्यंतचे आउटपुट देणारे ट्वीन स्पिकर्स आहेत. त्याचबरोबर डॉल्बी व्हिजन, HDR10, डॉल्बी अ‍ॅटमॉस, ड्युअल बँड वायफाय आणि डेटा सेव्हर फिचर देण्यात आला आहे.  

Nokia QLED स्मार्ट टीव्हीमध्ये क्वॉटंम डॉट फिल्टर असलेली क्वॉटंम डॉट टेक्नॉलॉजी आणि गामा इंजिन 2.2 देण्यात आले आहे. LED मॉडेल्समध्ये डोळयांच्या सुरक्षेसाठी खास आय प्रोटेक्शन मोड मिळतो. Nokia Smart TV रेंजमध्ये 1.1GHz स्पीड असलेला क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याला 2GB RAM आणि 700MHz G31 जीपीयूची जोड देण्यात आली आहे. या मॉडेल्समध्ये 16GB ची इंटरनल स्टोरेज मिळते.

Web Title: nokia qled other smart tvs powered by android 11 launched in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.