Metaverse मध्ये घेता येणार ओठांचं चुंबन, हजारो किलोमीटर दूरवरूनही जाणवणार स्पर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 18:48 IST2022-04-30T18:48:26+5:302022-04-30T18:48:32+5:30
मेटावर्स या व्हर्च्युअल जगात आता तुमच्या पार्टनरचं चुंबन घेता येईल तसेच स्पर्श देखील ऑफलाईन विश्वात जाणवेल. यासाठी टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं काम सुरु आहे.

Metaverse मध्ये घेता येणार ओठांचं चुंबन, हजारो किलोमीटर दूरवरूनही जाणवणार स्पर्श
मेटावर्स बाबत एक नवीन अपडेट समोर आला आहे. एका नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं मेटावर्समध्ये लोक त्यांच्या पार्टनरला किस करू शकतील आणि ते चुंबन त्यांना खऱ्या आयुष्यात अनुभवता देखील येईल. रिपोर्टनुसार, मेटावर्समध्ये तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत नसतानाही त्यांच्या ओठांना स्पर्श करू शकाल आणि त्यांचं चुंबन घेऊ शकाल.
ही नवीन टेक्नॉलॉजी असलेला विआर हेडसेट पेन्सिलवेनियामधील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी बनवला आहे. या हेडसेटमध्ये कशी हॅप्टिक (व्हायब्रेशन) टच देण्यात आला आहे. ही हॅप्टिक सिस्टम ओठ, दात आणि जिभेवर सर्वाधिक चांगलं काम करते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
नवीन टेक्नॉलॉजीला अल्ट्रासॉनिक ट्रांसड्यूसरच्या माध्यमातून व्हर्च्युअल रियलिटी (वीआर) हेडसेटमध्ये समाविष्ट करण्यात येईल. त्यामुळे वीआर हेडसेटमध्ये एक व्हायब्रेशन होईल जो लोकांना त्यांचा पार्टनर सोबतच असल्याचं भासवतो. फक्त चुंबन नव्हे तर झऱ्याचं पाणी पिणं, चहाचा घोट घेणं आणि सिगरेटचा झुरका देखील अनुभवता येईल.
मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी मेटावर्स हे व्हर्च्युअल विश्व जगासमोर ठेवलं आहे. सुरुवातीला या टेक्नॉलॉजीचा उपयोग अनेकांना समजला नाही. परंतु हळू हळू मेटावर्सचा वापर लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे. आता मेटावर्समध्ये लग्न पार पडली जात आहेत, म्युजिक कॉन्सर्ट होत आहेत इतकेच काय तर लोक मेटावर्समध्ये जागा देखील खरेदी करत आहेत.