रेल्वेचे नवीन अॅप! ट्रेन तिकीट कन्फर्म मिळेलच, पण Netflix सही पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 10:47 IST2023-05-17T10:47:16+5:302023-05-17T10:47:45+5:30
कंपनीने अॅपद्वारे पुढील 5 वर्षांत 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे.

रेल्वेचे नवीन अॅप! ट्रेन तिकीट कन्फर्म मिळेलच, पण Netflix सही पाहता येणार
भारतीय रेल्वेने नवा प्रयोग केला आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वे नवनवीन कल्पना लढवित आहे. यानुसार रेल्वेने NuRe भारत नेटवर्क आणि रेलटेलद्वारे एक नवीन अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे विविध सेवांचा लाभ उठविता येणार आहे. यामध्ये रेल्वे तिकीट, हॉटेल बुकिंग, मनोरंजन, कॅब बुकिंग आदी बरेच काही करता येणार आहे.
रेल्वेच्या या नव्या अॅपचे नाव PIPOnet आहे. रेलटेलने सांगितले की, न्यूरे भारत नेटवर्कसोबत एक्सक्ल्यूझिव्ह पार्टनरशिप करण्यात आली आहे. सध्या हे अॅप उपलब्ध करण्यात आलेले नाहीय. ते पुढील दोन आठवड्यांत प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, Netflix, Uber, Ola सारख्या सेवा अॅपमध्ये एकत्रित केल्या गेल्या आहेत. याशिवाय या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचे ऑनलाइन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, हॉटेल बुकिंग, जेवण आदी सुविधा उपलब्ध आहेत. या अॅपवर जाहिरातीसाठीही जागा देण्यात आली आहे. कंपनीने अॅपद्वारे पुढील 5 वर्षांत 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे.
तिकिट काढले तरी तुम्हाला या सेवा मोफत मिळणार नाहीएत. तर या सेवांसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. PIPOnet च्या सिंगल रेल्वे अॅपमध्ये तुम्हाला इतर अनेक अॅप्सच्या सुविधा मिळतील. अशा परिस्थितीत युजर्सना वेगवेगळे अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही.