काय? नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 04:59 PM2018-09-14T16:59:54+5:302018-09-14T17:05:13+5:30

भारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे.

new dual sim iphone's cant support indian SIM? | काय? नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत!

काय? नव्या आयफोनमध्ये भारतातील सिमकार्ड चालणार नाहीत!

अॅपलने आयफोन एक्स बंद करून तीन नवे त्यापेक्षा महागडे फोन लाँच केले असले तरीही हे फोन भारतात वापरायला मिळतील का, असा प्रश्न उभा ठाकणार आहे. याला कारण भारतात सध्या अस्तित्वात असलेली सिमकार्ड त्यात चालणार नाहीत. हे फोन पहिल्यांदाच ड्युअल सिमकार्ड स्लॉटसह येणार असले तरीही त्यात एक स्लॉट ई-सिमचा असणार आहे. यामुळे या फोनमध्ये भारतीयांना सध्यातरी एकच सिम वापरता येणार आहे.


अॅपलने iPhone XS, iPhone XS Max आणि XR नुकताच लाँच केला. या फोनचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे तो पहिल्यांदाच ड्युअल सिम प्रकारात आला आहे. भारतासह बऱ्याच देशांमध्ये ड्युअल सिमच्या फोनची चलती आहे. बरेचसे ग्राहक यामुळेच अॅपलपासून लांब राहत होते. परंतू, अॅपलने लाँच केलेले मोबाईल हे साधे सिम आणि ई-सिम अशा दोन सिमकार्डना सपोर्ट करणार आहेत. मात्र, अमेरिकेतही अद्याप ई-सिम मिळत नसून भारतात येणे जरा कठीणच दिसत आहे. 


भारतात सीडीएमएची जागा जीएसएम सिम कार्डने घेतली होती. आता ई-सिम हे जीएमएमच्या संघटनेने तयार केलेले व नव्या नियमावलीचे सिम आहे.  जीएमएमए ही संघटना जगभरातील सर्व नेटवर्क ऑपरेटरचे प्रतिनिधीत्व करते. हे एक इंटिग्रेटेड सिम असून ते फोनमध्येच बसविलेले असते. त्याला वेगळे करता येऊ शकत नाही. 


पहिल्यांदा या प्रकारचे सिम 2016 मध्ये सॅमसंगच्या गियर एस2 थ्रीजी मध्ये वापरण्यात आले होते. हे सिम साध्या सिमचेही काम करते. शिवाय यामध्ये मशिन टू मशिन आणि रिमोट प्रोविज़निंग क्षमता आहे.

 
जीएसएमपेक्षा तुलनेने हे सिम खूपच छोटे असल्याने ते मोबाईल किंवा स्मार्ट वॉचमध्ये बसविल्याने त्यांची जाडीही कमी होणार आहे. 
मात्र, सध्या अशा प्रकारच्या सिमची सेवा देणाऱ्या कंपन्या फारच थोड्या देशांमध्ये आहेत. 9 देशांमध्येच सध्या या प्रकारच्या सिम चालतात. तेही काही कंपन्यांद्वारेच सेवा पुरविली जाते. यामध्ये भारतही आहे. मात्र, या सिमवर सेवा पुरविणारे फारच कमी ऑपरेटर आहेत. यामुळे अॅपलने एअरटेल आणि जियो सोबत यासाठी करार केला आहे.

Web Title: new dual sim iphone's cant support indian SIM?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.