शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गेम्सनंतर Netflix ने लहान मुलांसाठी TikTok सारखे खास Kids Clips फिचर केले सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 7:22 PM

Kids Clip On Netflix: Kids Clips फीचर नेटफ्लिक्सने या आठवड्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि लॅटिन अमेरिकेत सादर केलं आहे.

नेटफ्लिक्स जगातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग कंपनी आहे. परंतु युजर्स वाढवण्यासाठी आणि असलेले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी Netflix आपल्या अ‍ॅपमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर गेम सादर केले होते. यात Stranger Things: 1984 (BonusXP), Stranger Things 3: The Game (BonusXP), Shooting Hoops (Frosty Pop), Card Blast (Amuzo & Rogue Games) आणि Teeter Up (Frosty Pop) या गेम्सचा समावेश होता. आता नेटफ्लिक्स आपल्या iOS अ‍ॅपवर लहान मुलांसाठी एक नवीन फीड टेस्ट करत आहे.  

नेटफ्लिक्सने Kids Clips नावाची नवीन फीड अ‍ॅपमध्ये सादर केली आहे. नेटफ्लिक्स किड्स क्लिपचा युजर इंटरफेस शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok आणि Instagram Reels सारखा दिसत आहे. या फीडमध्ये नेटफ्लिक्स लहान मुलांसाठी कंटेंट दाखवेल. जिथे लहान मुलांसाठी खास बनवलेल्या शॉर्ट क्लिप्स दिसतील, अशी माहिती द वर्जच्या रिपोर्टमधून मिळाली आहे.  

Kids Clips या फिचरच्या आधी Netflix ने यावर्षीच्या सुरुवातीला “Fast Laughs” फीचर देखील सादर केले होते. फास्ट लाफमध्ये कॉमेडी क्लिप्सचा समावेश होता. किड्स क्लिप फीडमध्ये पोट्रेट फॉरमॅटमध्ये लँडस्केप व्हिडीओ दिसतील. कंपनी एकावेळी 10 ते 20 क्लिप दाखवणार आहे, जेणेकरून युजर्सचा जास्त वेळ वाया जाणार नाही. कारण नेटफ्लिक्सने टिकटॉक लोकांचा वेळ वाया घालवत असल्याचा काही दिवसांपूर्वी आरोप केला होता.  

Kids Clips फीचर नेटफ्लिक्सने या आठवड्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि लॅटिन अमेरिकेत सादर केलं आहे. हे फिचर आयओएसवर उपलब्ध आहे, अँड्रॉइड युजर्सना याचा वापर करता येत नाही.  

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सtechnologyतंत्रज्ञान