नेट खल्लास ते बॅटरी डिस्चार्ज! तुम्ही किती तास पाहता मोबाइल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:02 IST2025-01-15T12:02:21+5:302025-01-15T12:02:32+5:30
हा अतिरेक विविध शारीरिक आणि मानसिक तक्रारींना निमंत्रण देत आहे.

नेट खल्लास ते बॅटरी डिस्चार्ज! तुम्ही किती तास पाहता मोबाइल?
- महेश घोराळे
मुंबई : मोबाइलवर सर्वच कामे चुटकीसरशी होत असल्याने एक भले मोठे संस्थान खिशात आले आहे. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत जागून झोपेचा खोळंबा करणाऱ्या या मोबाइलवर दिवसभरही बोटांच्या कसरती सुरू असतात. मात्र, याच मोबाइलचा अतिरेकी वापर दिवसेंदिवस वाढत असून, तो प्रतिदिवस दोन तासांहून चार तासांवर आला आहे. हा अतिरेक विविध शारीरिक आणि मानसिक तक्रारींना निमंत्रण देत आहे.
१३ वर्षांत काय बदलले
२०१० २०२३
प्ले स्टोर ॲप्स संख्या ०.१ लाख ३५ लाख
स्मार्टफोन विक्री ०.३ अब्ज १.४ अब्ज
इंटरनेट किती लोकांकडे ०.१ टक्के ७१ टक्के
दैनंदिन वापर २ तास ४.९ तास
८४% लोक झोपेतून उठल्यानंतर १५ मिनिटांतच फोन चेक करतात.
३१% जागरणातील वेळ मोबाइलमध्ये खर्च करतात
मोबाइलचा वापर
५०% ते ५५% ओटीटी, रिल्स, व्हिडीओ, संगीत
२०% ते २५%
कॉल, संदेश, मेल, सोशल मीडिया
७% ते ९%
शोध - प्रवास, जॉब, रेसिपी इत्यादी.
६% ते ८%
गेमिंग
५% ते ७%
ऑनलाइन खरेदीसाठी
(स्रोत : बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप)
या सवयी तुम्हाला तर नाहीत ना?
६५% युजर्स बॅटरी संपल्यामुळे अस्वस्थ होतात
४०% युजर्स दिवसाची सुरुवात किंवा शेवट स्मार्टफोन घेऊन करतात
८७% लोक चार्ज होताना स्मार्टफोन वापरतात.
४६% दिवसातून दोनदा फोन चार्ज करतात.
८० वेळा दिवसभरात एक व्यक्ती आपला फोन तपासतो. (सरासरी प्रमाण)