आज का साजरा केला जातो National Technology Day? जाणून घ्या या दिवसाचं महत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:27 IST2022-05-11T15:27:36+5:302022-05-11T15:27:49+5:30
National Technology Day 2022: आज संपूर्ण भारतभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जात आहे.

आज का साजरा केला जातो National Technology Day? जाणून घ्या या दिवसाचं महत्व
आज 11 मे रोजी भारतात नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जात आहे. या तारखेची निवड करण्यामागे खास कारण आहे. या दिवशी भारताने एक नव्हे तर तीन तीन मोठे कारनामे करून दाखवले आहेत. त्यामुळे 11 मे टेक्नॉलॉजी डे म्हणून जास्त योग्य वाटतो. आजच्या दिवशी 11 मे 1998 रोजी भारताच्या पहिल्या अणू बॉम्बची चाचणी करण्यात आली होती.
भारतानं तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केली आहे. देशाच्या विकासासाठी झटत असलेल्या लोकांची आठवण म्हणून 11 मे National Technology Day स्वरूपात सादर केला जंतू. 11 मे 1998 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी राष्ट्र्पती डॉक्टर एपीजे अब्दुल कमाल यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधील पोखरण येथे अणू चाचणी करण्यात आली होती.
यशस्वी अणू चाचणी
भारताने 11 मेला पहिली अणू चाचणी केली होती आणि 13 मेला देखील दोन अणू चाचण्या करण्यात आल्या. यामुळे भारताचं नाव अणू शक्ती असलेल्या देशांमध्ये समाविष्ट झालं. या चाचण्याचं नेतृत्व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी केलं होतं. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशननं या चाचणीचं नाव शक्ती ठेवलं होतं. परीक्षण केल्यानंतर पोखरण आणि आसपासच्या परिसरात 5.3 रिक्टर स्केलचा भूकंप देखील नोंदवण्यात आला होता.
या अणू चाचणीची आठवण म्हणून 11 मे 1999 पासून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अथात National Technology Day ची सुरुवात करण्यात आली. 11 मेला भारताने अजून एक कारनामा केला होता, जो या दिवसाचं महत्व आणखी वाढवतो. आजच्या दिवशीच भारताच्या डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) नं आपल्या त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. तसेच आजच्या दिवशी स्वदेशी बनावटीच्या Hansa-3 एयरक्राफ्टनं देखील पहिल्यांदा आकाशात झेप घेतली होती.