आता मुकेश अंबानी Ai क्षेत्रात नवी क्रांती करणार; Jio ने बनवला मास्टर प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:52 IST2024-12-30T18:52:09+5:302024-12-30T18:52:41+5:30
Mukesh Ambani Reliance Ai Sector : मुकेश अंबानी यांनी Ai क्षेत्रात क्रांती घडवण्यसाठी एका मोठ्या कंपनीसोबत बोलणी सुरू केली आहे.

आता मुकेश अंबानी Ai क्षेत्रात नवी क्रांती करणार; Jio ने बनवला मास्टर प्लॅन
Mukesh Ambani Reliance Ai Sector : रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी Jio लॉन्च केल्यानंत टेलिकॉम क्षेत्रात नवीन क्रांती घडली. यामुळे देशातील कोट्यवधी ग्राहकांना अतिशय स्वस्तात डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळायला लागली. आता पुन्हा एकदा अंबानी नवी क्रांती घडवण्याच्या तयारीत आहेत. आता ही क्रांती Ai क्षेत्रात घडणार आहे.
रिलायन्स Jio ने टेक कंपनी Nvidia सोबत भागीदारीत नवीन Ai मॉड्यूल तयार करण्याची योजना आखली आहे. यामुळे ग्राहकांना परवडणारी किमतीत Ai AA सेवा आणि Ai एजंट ऍप्लिकेशन सारख्या सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार, Jio ला स्टार्टअप्स आणि संशोधकांना जगातील सर्वात परवडणाऱ्या किंमतीवर GPU-एज-ए-सर्व्हिस द्यायची आहे.
गरजेनुसार AI चा वापर
रिपोर्ट्सनुसार, Jio ने लोकांना त्यांच्या गरजा आणि आवडीनुसार AI सुविधा देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे, कंपनी स्वस्त AI साठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर काम करत आहे. Jio Platforms Nvidia सोबत रिटेल, हेल्थकेअर, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआय वापर वाढवण्यासाठी काम करत आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिओने ज्या प्रकारे प्रत्येकाला डेटा वापरण्याची सुविधा दिली आहे. तसेच, AI सोबतही असेच करायचे आहे.