15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ शानदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध  

By सिद्धेश जाधव | Updated: November 2, 2021 12:44 IST2021-11-02T12:44:35+5:302021-11-02T12:44:42+5:30

108MP Camera Phone Under 15000 On Flipkart:  मोटोरोला जी60 चा एकमेव 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

Motorola g60 phone with 108mp camera available under 15000 rupees in flipkart sale  | 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ शानदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध  

15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ शानदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध  

सणासुदीला फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी नेहमीच एक चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन लागतो. जर तुम्ही एक मोठा सेन्सर असलेला स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Flipkart वर ही संधी मिळत आहे. 108MP Camera असलेला Motorola G60 स्मार्टफोन 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत घेता येईल.  

Motorola G60 ची किंमत आणि ऑफर्स 

मोटोरोला जी60 चा एकमेव 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. इत्यावर SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर केल्यास 1250 रुपये पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. त्यामुळे हा फोन 14,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फ्लिपकार्ट सेलचा आज म्हणजे 2 नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे.  

Motorola G60 चे स्पेसिफिकेशन्स  

Moto G60 स्मार्टफोन 6.8-इंचाचा मॅक्स विजन FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेशिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येते. सिक्योरिटीसाठी यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.    

Moto G60 स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेराआणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा आहे. या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आली आहे.   

Web Title: Motorola g60 phone with 108mp camera available under 15000 rupees in flipkart sale