मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 23:21 IST2025-07-30T23:19:32+5:302025-07-30T23:21:17+5:30

Moto G86 Power 5G Launched: भारतात मोटो जी ८६ पॉवर स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला.

Moto G86 Power 5G Launched In India, Know Price and Specifications | मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!

मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!

भारतात मोटो जी ८६ पॉवर स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. या फोनमध्ये कंपनीने मोठ्या डिस्प्लेसह ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. पाणी आणि धूळपासून सुरक्षिततेसाठी फोनला IP68 + IP69 रेटिंग देण्यात आले आहे. याशिवाय, हा फोन जंबो बॅटरीसह बाजारात दाखल झाला आहे. फोनमध्ये टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. कंपनीने स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च झाला आहे. 

मोटो जी ८६ पॉवर 5G: डिस्प्ले आणि स्टोरेज
या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा पॉलेड डिस्प्ले मिळत आहे. त्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे, पिक्सेल रिझोल्यूशन २७१२×१२२० आहे आणि पीक ब्राइटनेस ४५०० निट्स आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ७४०० ४एनएम प्रोसेसर दिला. या फोनमध्ये ८ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते.

मोटो जी ८६ पॉवर 5G: कॅमेरा आणि बॅटरी
फोटोग्राफीसाठी, कंपनीने फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ओआयएस सपोर्टसह ५० एमपीचा मुख्य कॅमेरा आणि ८ एमपीचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला. फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. मोटोरोलाचा नवीन फोन ६७२०mAh बॅटरीसह येतो, जे ३३ वॅट टर्बो चार्जिंग सपोर्टसह येतो.

मोटो जी ८६ पॉवर 5G: किंमत
या स्मार्टफोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री ६ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. हा फोन मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाइट, ऑफलाइन स्टोअर्स आणि लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. स्मार्टफोनच्या पहिल्या सेलमध्ये १००० रुपयांची बँक डिस्काउंट आणि १००० रुपयांची एक्स्चेंज ऑफ उपलब्ध असेल. त्यामुळे सेलमध्ये हा फोन १५ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

Web Title: Moto G86 Power 5G Launched In India, Know Price and Specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.