Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:09 IST2025-11-05T15:07:09+5:302025-11-05T15:09:23+5:30
Moto G67 Power 5G Launched in India: दमदार बॅटरी, उत्कृष्ट कॅमेऱ्यासह मोटोरोला कंपनीचा नवा स्मार्टफोन मोटो जी६७ पॉवर 5G भारतात लॉन्च झाला.

Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
दमदार बॅटरी, उत्कृष्ट कॅमेऱ्यासह मोटोरोला कंपनीचा नवा स्मार्टफोन मोटो जी६७ पॉवर 5G भारतात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ७००० एमएएचची क्षमता असलेली सिलिकॉन- कॉर्बन बॅटरीसह 50-मेगापिक्सेल सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा मिळतो. हा फोन कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
मोटो जी६७ पॉवर (८जीबी रॅम आणि १२८ स्टोरेज) या फोनची किंमत १५ हजार ९९९ पासून सुरू होते. १२ नोव्हेंबरपासून तुम्ही हा फोन कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. फोनचे रंग देखील खूपच आकर्षक आहेत आणि मोटो जी६७ पॉवर ५जी पॅराशूट पर्पल, पॅन्टोन ब्लू कुराकाओ आणि पॅन्टोन सिलांट्रो रंगांमध्ये उपलब्ध असेल.
The all-new #MotoG67POWER packs a 7000mAh Silicon-Carbon battery, 50MP Sony LYT-600 camera with 4K on all lenses & Snapdragon® 7s Gen 2 power — all in a sleek, durable design with Gorilla Glass 7i.
— Motorola India (@motorolaindia) November 5, 2025
Sale starts Nov 12 at ₹14,999* on Flipkart & https://t.co/azcEfy2uaW. pic.twitter.com/0mIzuMXtro
मोटो जी६७ पॉवर ५जी: कॅमेरा
मोटो जी६७ पॉवर ५जी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात ५०-मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी-६०० मुख्य कॅमेरा f/१.८ अपर्चरसह आणि ८-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा f/२.२ अपर्चरसह मिळतो. यात 'टू-इन-वन फ्लिकर' कॅमेरा देखील आहे. शिवाय, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला.
मोटो जी६७ पॉवर ५जी: डिस्प्ले
फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ६.७ -इंच फुल HD+ (1,080×2,400 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे. हा ड्युअल-सिम फोन आहे जो Android 15-आधारित Hello UX वर चालतो. कंपनीने या फोनसाठी एक OS अपग्रेड आणि तीन वर्षांच्या सुरक्षा पॅचेसचे आश्वासन दिले आहे.
मोटो जी६७ पॉवर ५जी: कनेक्टिव्हीटी
मोटो जी६७ पॉवर ५जी मध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर, अँबियंट लाईट सेन्सर, जायरोस्कोप, SAR सेन्सर आणि ई-कंपास देखील आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, हे 5G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि BeiDou ला सपोर्ट करते. यात डॉल्बी अॅटमॉस आणि हाय-रेंज ऑडिओ सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर सेटअप देखील आहे. कंपनीचा दावा आहे की, हँडसेट धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी IP64 रेटेड आहे. मागील पॅनलमध्ये व्हेगन लेदर फिनिश देखील आहे.