Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:08 IST2025-12-17T17:07:45+5:302025-12-17T17:08:54+5:30
Moto G Power 2026 Launched: मोटोरोलाचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन मोटो जी पॉवर २०२६ बाजारात दाखल झाला आहे.

Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
मोटोरोलाने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन मोटो जी पॉवर (२०२६) जागतिक बाजारपेठेत अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. मागील वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत या नवीन स्मार्टफोनमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. कंपनीने प्रामुख्याने कॅमेरा क्वालिटी, डिस्प्ले प्रोटेक्शन आणि नवीन रंगांवर भर दिला आहे. सध्या हा फोन अमेरिका आणि कॅनडामध्ये लॉन्च करण्यात आला असून लवकरच तो इतर देशांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मोटोरोला जी पॉवर २०२६ केवळ एकाच व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला असून यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. अमेरिकेत हा फोन २९९.९९ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास २७ हजार १०० रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर, कॅनडात या फोनची किंमत ४४९.९९ कॅनेडियन डॉलर्स (जवळपास २९ हजार ५५० रुपये) आहे. हा स्मार्टफोन इव्हिनिंग ब्लू आणि प्युअर काश्मीरी या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. येत्या ८ जानेवारी २०२६ पासून या फोनची अधिकृत विक्री सुरू होईल.
या फोनमध्ये ६.८ इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून, तो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे, यात १००० निट्सपर्यंत ब्राइटनेस वाढवण्यासाठी 'हाय ब्राइटनेस मोड' देण्यात आला आहे. स्क्रीनच्या सुरक्षिततेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i मिळत आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर असून हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १६ वर काम करतो.
फोटोग्राफीसाठी मोटो जी पॉवर (२०२६) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेल आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळतो. महत्त्वाचे म्हणजे, या नवीन मॉडेलमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला. याशिवाय, या फोनमध्ये ऑटो नाईट व्हिजन, पोर्ट्रेट मोड आणि एआय शॉट ऑप्टिमायझेशन यांसारखे फीचर्सही देण्यात आली आहेत.