शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

एकवेळ तुम्ही हरवाल, पण मोबाईल हरवणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:56 IST

पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

आज मोबाईलमध्ये महत्वाचे इमेल, फोन नंबर, बँकांची माहिती, सोशल मिडीयास पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती स्टोअर केलेली असते. यामुळे मोबाईल हरवल्यास काय अवस्था होते, हे सांगायला नकोच. पर्यटन स्थळी, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याची जास्त शक्यता असते. हा प्रसंग टाळण्यासाठी काही प्रमाणात काळजी घेतल्यास समस्या येणार नाही. 

मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ट्रॅक करण्य़ासाठी काही अॅप्स आहेत. नवा मोबाईल घेतल्यानंतर फाईंड माय डिव्हाईस हे गुगलचे अॅप डाऊनलोड करून रजिस्टर करावे. म्हणजे एखाद्यावेळी मोबाईल सापडत नसल्यास या अॅपद्वारे ट्रॅक करता येईल. हा झाला मोबाईल हरवल्यानंतरचा उपाय. परंतू काही प्रमाणात काळजी घेतल्यास मोबाईल हरविण्याची शक्यता कमी होईल.

 मोबाईल फोन गर्दीच्या ठिकाणी जास्त हरवतात. अशावेळी मोबाईल हातात ठेवावा. जर फोन बॅगमध्ये ठेवत असल, तर तो थोडा आतमध्ये परंतू खालच्या बाजुला ठेवू नये. कारण बॅगेला खालून कापूनही फोन लंपास केले जातात. फोनवर कमी आवाजामध्ये गाणी ऐकायची असल्यास हेडफोन लावून फोन खिशात ठेवू शकता. कारण आवाज ऐकत असल्याने चोर असे फोन काढण्याची शक्यता कमीच असते. आपल्या फोनचा आयएमइआय नंबर कुठेतरी लिहून ठेवावा. हा नंबर डायल पॅडवर *#06# लिहिल्यानंतर मिळतो. किंवा मोबाईलच्या बॉक्सवर नमूद असतो. यामुळे चोरी झालेल्या फोनचे लोकेशन समजू सकते. 

बऱ्याचदा असे होते की, चोरीला गेलेला फोन वाय फाय सर्व्हिस किंवा इंटरनेटल जोडलेला नसेल. पंरतू तुम्हाला तुमची माहिती सुरक्षित ठेवायची आहे. अशावेळी अॅपद्वारे फोनवर नियंत्रण मिळवता येते. तुमची माहिती डिलीट करून फोन मिळाल्यानंतर ती पुन्हा मिळवता येते. 

दुसऱ्या फोनला आपल्या गुगुल अकाऊंटशी जोडणेही फायद्याचे ठरते. म्हणजेच स्मार्टवॉच, टॅबलेट सारखे गॅजेट हरवले असेल तर ते गुगलशी जोडलेले असल्यास परत मिळवता येते. परंतू यासाठी जेव्हा नवीन फोन घ्याल तेव्हापासूनच गुगलचे फाईंड माय डिव्हाईस हे अॅप डाऊनलोड केल्यास वेळ निघून जात नाही. 

टॅग्स :googleगुगलMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी