1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:20 IST2025-11-06T11:19:55+5:302025-11-06T11:20:33+5:30

Jio Airtel Vi Recharge Plans : माध्यमांतील वृत्तांनुसार, ग्राहकांना रिचार्जसाठी सध्याच्या तुलनेत सुमारे 10 ते 12 टक्के अधिक पैसे द्यावे लागू शकतात...

Mobile recharge plans will become expensive again from December 1 how much will the Rs 199 pack cost Big claim | 1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा

1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा

गेल्या काही दिवसांपासून मोबाईल रिचार्जचे दर वाढणार असल्याचे बोलले जात आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi)  या देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या डिसेंबर 2025 पासून आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ग्राहकांना रिचार्जसाठी सध्याच्या तुलनेत सुमारे 10 ते 12 टक्के अधिक पैसे द्यावे लागू शकतात. मात्र, अद्याप या संदर्भात कोणत्याही कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही.

टेक टिप्स्टर 'अभिषेक यादव'ने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टनुसार, भारतातील मोबाईल डेटा प्लॅनचे दर लवकरच वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या मते, जिओ, एअरटेल आणि Vi हे तिन्ही ऑपरेटर सुमारे 10 टक्क्यांपर्यंत दरवाढ करू शकतात. सध्या 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा देणारा प्लॅन 949 रुपयांना मिळतो, मात्र दरवाढीनंतर त्याची किंमत 999 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

याशिवाय DealBee Deals च्या एक्स पोस्टनुसार, 1 डिसेंबर 2025 पासून रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, 199 रुपयांचा प्लॅन वाढून सुमारे 219 रुपये होऊ शकतो. तर 899 रुपयांचा प्लॅन सुमारे 999 रुपयांचा होऊ शकतो. मात्र, या दरवाढीसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नसल्याचे त्यांनीही स्पष्ट केले आहे.

मात्र, टेलिकॉम कंपन्यांनी आपले दर वाढवले तर, डिसेंबरपासून देशभरातील लाखो मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. मोबाईल डेटा आणि इंटरनेट हे आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. यामुळे रिचार्ज दरांतील ही वाढ थेट ग्राहकांच्या मासिक खर्चावर परिणाम करेल. 


 

Web Title : 1 दिसंबर 2025 से मोबाइल रिचार्ज प्लान महंगे होने की संभावना

Web Summary : दिसंबर 2025 से मोबाइल रिचार्ज दरें बढ़ सकती हैं। जियो, एयरटेल और वीआई द्वारा कीमतें 10-12% तक बढ़ाने की उम्मीद है। ₹199 का प्लान ₹219 और ₹899 का प्लान ₹999 तक हो सकता है, जिससे उपयोगकर्ताओं के मासिक खर्च प्रभावित होंगे।

Web Title : Mobile Recharge Plans Likely to Get Expensive From December 2025

Web Summary : Mobile recharge rates may increase from December 2025. Jio, Airtel, and Vi are expected to raise prices by 10-12%. A ₹199 plan could cost ₹219, and a ₹899 plan could reach ₹999, impacting users' monthly expenses.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.