मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! २२ वर्षानंतर ही सेवा बंद केली; कधीकाळी व्हिडीओ कॉलसाठी वापरले जायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:06 IST2025-03-01T11:03:45+5:302025-03-01T11:06:30+5:30

मायक्रोसॉफ्ट आता त्यांचे बहुचर्चित असलेले एक अॅप बंद करत आहे. कंपनीकडून अजून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Microsoft's big decision skype service has been discontinued after 22 years It was once used for video calls | मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! २२ वर्षानंतर ही सेवा बंद केली; कधीकाळी व्हिडीओ कॉलसाठी वापरले जायचे

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! २२ वर्षानंतर ही सेवा बंद केली; कधीकाळी व्हिडीओ कॉलसाठी वापरले जायचे

मायक्रोसॉफ्ट आता त्यांचे बहुचर्चित असलेले एक अॅप बंद करत आहेत. हे अॅप गेल्या २२ वर्षापासून आपल्या सेवेत आहे. या अॅप म्हणजे व्हिडीओ चॅटिंग प्लॅटफॉर्म स्काईप. आता ते बंद करणार आहेत. विंडोजसाठीच्या नवीनतम स्काईपच्या प्रिव्ह्यूमध्ये काही पॅच नोट्स दिसल्या आहेत,यावरुन हा अंदाज लावला जात आहे. ही सेवा मे २०२५ मध्ये बंद होऊ शकते. आजही या प्लॅटफॉर्मवर लाखो वापरकर्ते आहेत.

स्काईप बंद केल्यानंतर, कंपनी आपल्या वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये मायग्रेट केले जाणार आहे. याचा अर्थ कंपनी स्काईपची जागा टीम्सने घेत आहे.

UPI, म्युच्युअल फंड ते LPG; आजपासून बदलले 'हे' ६ नियम, खिशावर थेट होणार परिणाम

XDA डेव्हलपर्संना स्काईपच्या विंडोज अॅपवर हा संदेश दिसला आहे. यामध्ये लिहिले आहे की, 'मे महिन्याच्या सुरुवातीपासून स्काईप उपलब्ध राहणार नाही. तुम्ही टीम्सवर तुमचे कॉल आणि चॅट सुरू ठेवू शकता. याशिवाय, स्काईप अॅप वापरकर्त्यांना टीम्स डाउनलोड करण्यास आणि त्यावर स्थलांतर करण्यास देखील प्रवृत्त करेल.

मायक्रोसॉफ्टने याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच त्यांनी अशा अहवालांवर भाष्य केलेले नाही. मायक्रोसॉफ्टने ३१ जुलै २०२१ रोजीच स्काईप फॉर बिझनेस बंद केले.

२००३ सुरू झाले होते अॅप

स्काईपची ग्राहक व्हर्जन अजूनही उपलब्ध आहे. आजही या प्लॅटफॉर्मवर २ कोटी वापरकर्ते आहेत.  कंपनीने ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २००३ मध्ये चार डेव्हलपर्सनी स्काईप लाँच केले होते. हा एक ऑडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म होता जो परवडणाऱ्या दरात सेवा देत होता.

Web Title: Microsoft's big decision skype service has been discontinued after 22 years It was once used for video calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.