विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर लॅपटॉप आणू शकते Microsoft; Windows 11 सपोर्टसह होणार लाँच
By सिद्धेश जाधव | Updated: October 27, 2021 17:05 IST2021-10-27T15:27:36+5:302021-10-27T17:05:46+5:30
Windows 11 Laptop For Students: टेक मायक्रोसॉफ्ट विद्यार्थ्यंसांठी स्वस्त लॅपटॉप सादर करण्याची तयारी करत आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

विद्यार्थ्यांसाठी किफायतशीर लॅपटॉप आणू शकते Microsoft; Windows 11 सपोर्टसह होणार लाँच
Microsoft विद्यार्थ्यांसाठी परवडणाऱ्या किंमतीत लॅपटॉप लाँच करू शकते, असा दावा विंडोज सेंट्रलच्या Zac Bowden यांनी केला आहे. या डिवाइसचे कोडनेम Tenjin असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा लॅपटॉप अॅप्पलच्या आयपॅड आणि गुगलच्या Chromebook ला टक्कर देण्यासाठी कंपनी हा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मायक्रोसॉफ्ट आपल्या सर्फेस लाईनअप अंतर्गत लॅपटॉप लाँच करत असते. हे लॅपटॉप प्रीमियम कॅटेगरीमध्ये येतात. परंतु कंपनी Surface Go 3 आणि Surface Laptop Go सारख्या स्वस्त डिवाइसेसच्या माध्यमातून ग्राहक संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी Tenjin मुळे ही संख्या अजून वाढेल असे सांगण्यात आले आहे. Bowden यांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्वस्त सर्फेस लॅपटॉप यावर्षीच्या अखेरपर्यंत बाजारात येईल. याची किंमत Surface Go 3 च्या डुमरे 29,900 रुपयांपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे.
स्पेसिफिकेशन
रिपोर्टनुसार, लॅपटॉपमध्ये Intel Celeron N4120 प्रोसेसर आणि 8GB RAM देण्यात येईल. यात 1366×768 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 11.6 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या लॅपटॉप मध्ये एक USB Type-A, एक USB Type-C आणि 1 हेडफोन जॅक मिळेल. रिपोर्टनुसार Tenjin लॅपटॉपमध्ये Windows 11 चे स्पेशल व्हर्जन मिळेल. जे Windows 11 SE नावाने ओळखले जाईल. हे व्हर्जन लॉ-एन्ड डिवाइसेससाठी आहे.