लॅपटॉपची कामं करा टॅबलेटवर! 32GB RAM आणि 1TB च्या दमदार स्टोरेजसह Microsoft चे दोन पॉवरफुल टॅब भारतात लाँच; इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: January 20, 2022 08:18 PM2022-01-20T20:18:29+5:302022-01-20T20:19:51+5:30

Microsoft Surface Pro 8 आणि Surface Pro 7+ भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर, विंडोज 11 असे फीचर मिळतात, तसेच हे 16 तासांचा बॅटरी लाईफ देऊ शकतात.

Microsoft surface pro 8 and surface pro 7 plus launched in india check price and details  | लॅपटॉपची कामं करा टॅबलेटवर! 32GB RAM आणि 1TB च्या दमदार स्टोरेजसह Microsoft चे दोन पॉवरफुल टॅब भारतात लाँच; इतकी आहे किंमत 

लॅपटॉपची कामं करा टॅबलेटवर! 32GB RAM आणि 1TB च्या दमदार स्टोरेजसह Microsoft चे दोन पॉवरफुल टॅब भारतात लाँच; इतकी आहे किंमत 

googlenewsNext

Microsoft Surface Pro 8 आणि Surface Pro 7+ भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर, विंडोज 11 असे फीचर मिळतात, तसेच हे 16 तासांचा बॅटरी लाईफ देऊ शकतात. दोन्ही टॅब सध्या प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत परंतु यांची विक्री 15 फेब्रुवारीपासून सुरु होईल. यातील सर्फेस प्रो 8 मायक्रोसॉफ्टचा आता पर्यंतचा सर्वात शक्तीशाली इंटेल ईवो सर्टिफाइड प्रो टॅबलेट आहे.  

Microsoft Surface Pro 8 चे स्पेसिफिकेशन्स 

मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 8 कोमध्ये 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट आहेत. सरफेस प्रो 8 वाय-फाय मॉडेलमध्ये 32GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध होईल. तर LTE मॉडेलमध्ये 17GB पर्यंतरॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल.  

सरफेस प्रो 8 मध्ये 13 इंचाचा (2880x1920 पिक्सल) पिक्सलसेंस टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात व्हिडीओ कॉलसाठी 5-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 4K व्हिडीओ सपोर्टसह 10-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा टॅब नवीन सर्फेस प्रो सिग्नेचर कीबोर्ड आणि सर्फेस स्लिम पेन 2 ला सपोर्ट करतो. हा टॅब 16 तासांचा बॅटरी लाईफ देऊ शकतो. यात वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1 आणि वाय-फाय मॉडेलवर दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट देण्यात आले आहेत. तर LTE मॉडेल सिम कार्ड स्लॉटसह येतो. 

Microsoft Surface Pro 7+ चे स्पेक्स 

मायक्रोसॉफ्ट सर्फेस प्रो 7+ 11th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसरसह बाजारात आला आहे. याच्या वाय-फाय व्हेरिएंटमध्ये 32GB पर्यंत रॅम आणि LTE व्हेरिएंटमध्ये 16GB पर्यंत रॅम मिळतो. सरफेस प्रो 7+ चा कोर i3 मॉडेल इंटेल यूएचडी ग्राफिक्ससह आला आहे. तर कोर i5 आणि कोर i7 मॉडेलमध्ये इंटेल आयरिस एक्सई ग्राफिक्स मिळतात.  

मायक्रोसॉफ्ट सर्फेस प्रो 7+ मध्ये 12.3 इंचाचा (2,736x1,824 पिक्सल) पिक्सलसेंस टच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 267ppi आहे. या टॅबच्या वाय-फाय मॉडेलमध्ये रिमूवेबल SSD स्टोरेज देण्यात आली आहे जी 1 टीबी पर्यंत वाढवता येते. तर LTE व्हेरिएंट 256GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. सरफेस प्रो 7+ फुल-एचडी क्वालिटी व्हिडीओ व्हिडीओ कॉलसाठी 5-मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर मागे फुल एचडी रिकॉर्डिंगसह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.0, एक यूएसबी टाइप-सी, यूएसबी टाइप-ए पोर्ट सह एक मायक्रोएसडी कार्ड रीडर आणि वाय-फाय मॉडेलवर सरफेस कनेक्ट चार्जिंग पोर्ट मिळतो. LTE व्हर्जन सिम कार्ड स्लॉट सह येतो. 

Microsoft Surface Pro 8 आणि Surface Pro 7+ ची किंमत 

मायक्रोसॉफ्ट सर्फेस प्रो 8 च्या वाय-फाय मॉडेलची किंमत 1,04,499 रुपये आणि LTE मॉडेलची किंमत 1,27,599 रुपये आहे. हा टॅब सर्फेस प्रो सिग्नचेर कीबोर्ड वापरून 2 इन 1 पीसी बनवता येईल, जो काही निवडक रिटेलर्स प्री ऑर्डरवर मोफत देत आहेत. मायक्रोसॉफ्ट सर्फेस प्रो 7+ च्या वाय-फाय मॉडेलसाठी 83,999 रुपये तर LTE मॉडेलसाठी 1,09,499 रुपये मोजावे लागतील. 

हे देखील वाचा:

दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा

12GB Ram असलेला Realme GT Neo 3 लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट; 5,000mAh बॅटरीसह येणार बाजारात

Web Title: Microsoft surface pro 8 and surface pro 7 plus launched in india check price and details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tabletटॅबलेट