चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आला ‘स्वदेशी स्मार्टफोन’; किंमत फक्त 7,499 रुपये 

By सिद्धेश जाधव | Published: April 26, 2022 03:00 PM2022-04-26T15:00:25+5:302022-04-26T15:00:34+5:30

Micromax In 2c स्मार्टफोन भारतात 5,000mAh बॅटरी, 3GB RAM, Unisoc T610 SoC चिपसेट आणि 8MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.  

Micromax In 2c Launch Price India Rs 7499   | चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आला ‘स्वदेशी स्मार्टफोन’; किंमत फक्त 7,499 रुपये 

चिनी कंपन्यांना हद्दपार करण्यासाठी आला ‘स्वदेशी स्मार्टफोन’; किंमत फक्त 7,499 रुपये 

Next

Micromax सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय नाही. कंपनी काही निवडक स्मार्टफोन सादर करून स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. आता कंपनीनं Micromax In 2c नावाचा बजेट स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. ज्यात 5,000mAh बॅटरी, 3GB RAM, Unisoc T610 SoC चिपसेट आणि 8MP कॅमेरा असे फीचर्स देण्यात आले आहेत.  

Micromax In 2c ची किंमत 

Micromax In 2c स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट कंपनीनं सादर केला आहे. या मॉडेलमध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीनं आपल्या नव्या स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत काही काळ हा डिवाइस फक्त 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 1 मेपासून या हँडसेटची विक्री ब्राऊन आणि स्लिव्हर कलरमध्ये फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवरून केली जाईल.  

Micromax In 2c चे स्पेसिफिकेशन्स 

Micromax In 2c मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आहे. ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.  

मायक्रोमॅक्स इन 2सी मध्ये 6.52-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 720×1,600 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 263पीपीआय पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतो. फोन ऑक्टाकोर Unisoc T610 SoC चा वापर प्रोसेसिंगसती करतो. सोबत 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 256GB पर्यंत वाढवता येते.  

Web Title: Micromax In 2c Launch Price India Rs 7499  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.