शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

4K डिस्प्ले असलेला Xiaomi Mi TV Q1 लाँच; डॉल्बी ऑडियोसह मिळणार अनेक फीचर्स

By जयदीप दाभोळकर | Updated: February 9, 2021 16:34 IST

Xiaomi TV Launched : पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत विशेष फीचर्स

ठळक मुद्देया नव्या टीव्हीमध्ये QLED 4K डिस्प्ले देण्यात आला आहे.या टीव्हीसोबत ७ लाख मुव्ही आणि टीव्ही शोदेखील येतात

Xiaomi नं सोमवारी आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi 11 सोबतच Mi TV Q1 हा 75 इंचाचा टीव्हीदेखील लाँच केला. अँड्रॉईड 10 ओएसवर चालण्याऱ्या शाओमीच्या या नव्या टीव्हीमध्ये QLED 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं या टीव्हीची किंमत 1,299 युरो म्हणजेच जवळपास 1 लाख 14 हजार 300 रूपये इतकी ठेली आहे. या टीव्हीची एक खास बाब म्हणजे हा टीव्ही 7 लाख मुव्ही आणि टीव्ही शोंसह येतो. याव्यतिरिक्त टीव्हीमध्ये प्ले स्टोअरद्वारे 5 हजारांपेक्षा अधिक अॅप्स अॅक्सेस करता येऊ शकतात.शाओमीच्या या टीव्हीमध्ये 3840x2160 पिक्सल रेझॉल्यूशन सोबत 75 इंचचा QLED 4K UHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टीवी विशेष अशा क्वॉन्टम डॉट टेक्नॉलॉजी सोबत येतो. यामध्ये उत्तम पिक्चर क्वालिटीसाठी 120Hz च्या रिफ्रेश रेटसह एकदम कमी बेझल्स देण्यात आले आहेत. तसंच 1.07 बिलिअन कलर व्हेरिअशनसह 100 टक्के NTSC रेंज, 1,024 निरनिराळे कलर शेड आणि 10000:1 चा कॉन्ट्रास्ट रेशो मिळतो. टीवीच्या डिस्प्लेचा व्ह्युविंग अँगल 178 डिग्री आहे.

Xiaomi Mi 11 launched: 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 4,600mAh ची दमदार बॅटरी; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

काय आहेत स्पेसिफिकेशन्स ?जबरदस्त आवाजासाठी या टीव्हीमध्ये सहा स्पीकर्स देण्यात आले आहे. तसंच यात 30W ची स्टिरिओ स्पीकर सिस्टमही देण्यात आलीआहे. यामध्ये चार वूफर्सदेखील आहेच. याव्यतिरिक्त टीव्हीला डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस एचडी सपोर्टही देण्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी या टीव्हीमध्ये एक HDMI 2.1 पोर्ट, दोन HDMI 2.0 पोर्ट, दोन USB 2.0 पोर्ट, ड्यूल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5mm जॅक देण्यात आला आहे. याशिवाय आणखी अनेक ऑप्शन्स देण्यात आले आहे. गेमिंग आणि व्हिडीओ स्ट्रिमिंगसाठी या टीव्हीमध्ये लेटेन्सी मोडदेखील आहे. शाओमीचा हा प्रिमिअम टीव्ही बिल्टइन मायक्रोफोन आणि क्रोमकास्टसोबत येतो. याव्यतिरिक्त यात गुगल असिस्टंट आणि अॅमेझॉन अॅलेक्साचाही सपोर्ट आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानxiaomiशाओमीTelevisionटेलिव्हिजनSmartphoneस्मार्टफोन