Xiaomi Mi 11 launched: 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 4,600mAh ची दमदार बॅटरी; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By जयदीप दाभोळकर | Published: February 8, 2021 09:11 PM2021-02-08T21:11:57+5:302021-02-08T21:14:13+5:30

Xiaomi mi 11 launch: Xiaomi ने सोमवारी Mi 11 ग्लोबली केला लाँच

Xiaomi Mi 11 with MIUI 12 5 Snapdragon 888 mobile Global Launch Price Specs | Xiaomi Mi 11 launched: 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 4,600mAh ची दमदार बॅटरी; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 11 launched: 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 4,600mAh ची दमदार बॅटरी; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Next
ठळक मुद्देनव्या क्वालकॉम प्रोसेसरचा करण्यात आला आहे वापरदमदार स्पेसिफिकेशन्ससह फ्लॅगशिप स्मार्टफोन झाला लाँच

Xiaomi नं सोमवारी आपला Mi 11 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला. Mi 11 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन गेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरिस चीनमध्ये सादर करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC हा नवा प्रोसेसर देण्यात आला असून पंचहोल डिझाईनही आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजही देण्यातआलं आहे. 

Mi 11 च्या 8GB + 128GB स्टोरेजची किंमत 749 युरो म्हणजेच जवळपास 65,800 रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 799 युरो म्हणजेच जवळपास 70,100 रुपये इतकी आहे. हा फोन व्हाईट, ब्लू आणि मिडनाईट ग्रे या कलर्समध्ये उपलब्ध आहे. 



Mi 11 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा असून f/1.85 च्या सोबत येतो. याव्यतिरिक्त यासोबत 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलची मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन

Mi 11 ड्युअल सिम (नॅनो) सह येतो. याव्यतिरिक्त यामध्ये 6.81 इंचाचा 2K WQHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून तो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकमचा नवा स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरदेखील देण्यात आला आहे. शिवाय यात कॉर्निंग ग्लास विक्टस प्रोटेक्शनदेखील आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टम सोबतच MIUI 12 आहे. हा स्मार्टफोन 128 आणि 256 जीबी रॅम मेमरीसह येतो.

अंडर डिस्प्ले कॅमेरा, क्वाड कर्व्ह्ड वॉटरफॉल स्क्रिन; पाहा Xiaomi चा जबरदस्त स्मार्टफोन

Mi 11 मध्ये कनेक्टिव्हिटीचे 5G (Sub-6 GHz नेटवर्क्स), Wi-Fi 6E, 4G LTE, Infrared (IR), Bluetooth 5.2, NFC आणि अन्य पर्यायही देण्यात आले आहेत. फोनमध्ये असलेला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर हार्ट रेट मॉनिटरप्रमाणेही काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी देण्यात आली असून तो Mi TurboCharge 55W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

Web Title: Xiaomi Mi 11 with MIUI 12 5 Snapdragon 888 mobile Global Launch Price Specs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.