मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी तुम्ही जर व्हॉट्सअॅपचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ज्या फीचरची युजर्स गेल्या अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तेच फीचर व्हॉट्सअॅप लवकरच आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या फीचरच्या मदतीने, आता तुम्ही एकाच व्हॉट्सअॅपमध्ये अनेक अकाऊंट्स वापरू शकणार आहात आणि एका क्लिकवर त्यांच्यात स्विच करू शकणार आहात.
मेटाच्या मालकीचे व्हॉट्सअॅप सध्या या बहुप्रतिक्षित फीचरची चाचणी करत आहे. सध्या ही सुविधा केवळ व्हॉट्सअॅप बिझनेसमध्ये उपलब्ध होती किंवा युजर्सना एकाच फोनवर दोन अकाऊंट्स वापरण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स किंवा फोनमधील 'क्लोनिंग' फीचरचा वापर करावा लागत होता.
'Switch Accounts' फीचरची चाचणी सुरू
सध्या हे फीचर iOSच्या '25.19.20.74' बीटा टेस्टमध्ये काही निवडक युजर्सना दिसून आले आहे. या युजर्सना व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये “Switch Accounts” नावाचा एक नवीन पर्याय दिसत आहे. या फीचरमुळे एकाच स्क्रीनवर तुमच्याशी लिंक असलेले सर्व व्हॉट्सअॅप प्रोफाइल्स दिसतील आणि तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये तात्काळ स्विच करू शकाल. याआधी, युजर्सना वारंवार लॉग-इन आणि लॉग-आऊट करण्याची किचकट प्रक्रिया करावी लागत होती, जी आता पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.
हाय-डिमांडमध्ये का आहे हे फीचर?
भारतासह अनेक देशांमध्ये लोक एकाच फोनवर दोन व्हॉट्सअॅप अकाऊंट्स वापरतात. अनेकदा एकाच फोनचा वापर कुटुंबातील सदस्य करतात किंवा काही लोक पर्सनल आणि प्रोफेशनल चॅट्ससाठी वेगवेगळे प्रोफाइल वापरतात. प्रत्येकाच्या प्रायव्हसी सेटिंग्ज, चॅटिंग पद्धती आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे 'मल्टी-अकाऊंट' सपोर्टची मागणी युजर्सकडून अनेक वर्षांपासून केली जात होती आणि ते सर्वात आवश्यक फीचर मानले जात होते.
अँड्रॉइड युजर्ससाठी कधी येणार?
सध्या हे फीचर फक्त iOS बीटा व्हर्जनमध्ये दिसत असले तरी, व्हॉट्सअॅपचे अँड्रॉइड सपोर्ट नेहमीच जलद मानले जाते. तज्ज्ञांचे मत आहे की, iOSवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे फीचर लवकरच अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी देखील उपलब्ध होईल.
सध्या व्हॉट्सअॅपकडून याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, त्यामुळे हे फीचर सर्वसामान्य युजर्ससाठी कधी रोलआऊट होईल, याची निश्चित कालमर्यादा सांगता येत नाही. मात्र, सध्या हे फीचर अगदी प्राथमिक चाचणी टप्प्यात असून लवकरच हे बदल युजर्सच्या भेटीला येतील, अशी आशा आहे.
Web Summary : WhatsApp is testing a 'Switch Accounts' feature, allowing users to manage multiple accounts and switch between them easily. This eliminates the need for frequent log-ins, a highly requested feature for users with personal and professional accounts.
Web Summary : WhatsApp 'स्विच अकाउंट्स' फीचर का परीक्षण कर रहा है, जिससे उपयोगकर्ता कई अकाउंट प्रबंधित कर सकेंगे और आसानी से स्विच कर सकेंगे। इससे बार-बार लॉग-इन करने की आवश्यकता नहीं होगी, यह व्यक्तिगत और पेशेवर खातों वाले उपयोगकर्ताओं के लिए एक बहुप्रतीक्षित सुविधा है।