Reels बनवणारे कमवणार डॉलर्समध्ये; दरमहा 3 लाख मिळणार, Facebook ची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 15:26 IST2022-05-07T15:26:32+5:302022-05-07T15:26:52+5:30
Meta नं फेसबुक रील्सवर ओरिजनल कंटेंट बनवणाऱ्या क्रिएटर्सना दरमहा 3.07 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

Reels बनवणारे कमवणार डॉलर्समध्ये; दरमहा 3 लाख मिळणार, Facebook ची मोठी घोषणा
Reels बनवणाऱ्या क्रियेटर्ससाठी एक चांगली बातमी आली आहे, जिची अनेकजण वाट बघत होते. रील्सच्या माध्यमातून आता कमाई करता येईल, अशी घोषणा फेसबुकनं केली आहे. रील्स बनवून तुम्ही प्रत्येक महिन्याला 3 लाखांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करू शकता. फेसबुक रील्सवर ओरिजनल कंटेंट बनवणाऱ्या क्रिएटर्सना दरमहा 3.07 लाख रुपये देण्याची घोषणा मेटानं केली आहे.
मेटानं दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही फेसबुकवर ‘Challenges’ सादर करत आहोत, ज्यामुळे क्रिएटर्सना कंटेंटच्या माध्यमातून कमाई करण्यास मदत होते. यासाठी महिन्याला 4000 डॉलरपर्यंत कमवता येतील.” प्रोग्राम अंतगर्त काही चॅलेंजेस ठरवण्यात आले आहेत आणि प्रत्येक चॅलेंज पूर्ण केल्यास कमाई होत राहील.
विशेष म्हणजे कंटेंट क्रिएटर्सना हे पेमेंट डॉलरमध्ये देण्यात येईल, तसेच हे रील्सवरील व्यूजवर अवलंबून असेल. फेसबुक रील्सवर दरमहा 4,000 डॉलर्सपर्यंत कमवता येतील, असं कंपनीनं सांगितलं आहे. हे डॉलर्स रुपयांमध्ये रूपांतरित केल्यास सुमारे 3.07 लाख रुपये होतात.
उदाहरणार्थ, पहिल्या लेव्हलमध्ये जेव्हा क्रिएटर्सच्या 5 रील्स पैकी एकावर 100 पेक्षा जास्त व्यूज मिळवल्यास 20 डॉलर मिळवता येतील. “क्रिएटरनं एक चॅलेंज पूर्ण केल्यास, पुढील चॅलेंज उपलब्ध होईल. 5 रील्सच्या चॅलेंजनंतर क्रिएटर्सना 20 रील्सवर 500 व्यूज मिळवाव्या लागतील, त्यामुळे 100 डॉलर्स मिळतील. महिना पूर्ण झाल्यास पुन्हा 0 पासून सुरुवात करावी लागेल.