messenger like chat feature spotted on facebook app company plans to unify instagram and whatsapp soon | Facebook वर आले मेसेंजर चॅट फीचर; WhatsApp, Instagram एकत्र आणण्याचा विचार
Facebook वर आले मेसेंजर चॅट फीचर; WhatsApp, Instagram एकत्र आणण्याचा विचार

ठळक मुद्देफेसबुक सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूनिफाइड करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप हे एकत्र येणार आहे.  फेसबुक अ‍ॅपमध्ये मेसेंजर अ‍ॅपचे फीचर पाहिल्याची माहिती काही युजर्सनीच दिली आहे. अ‍ॅप्लिकेशन रिसर्चर जेन मांचुन वांग यांनी याबाबतचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये मेसेंजर फंक्शन फेसबुक अ‍ॅपमध्ये अ‍ॅड झाल्याचं दिसत आहे.

नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्म यूनिफाइड करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप हे एकत्र येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मचा विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता त्या दृष्टीने फेसबुकने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.  फेसबुक अ‍ॅपमध्ये मेसेंजर अ‍ॅपचे फीचर पाहिल्याची माहिती काही युजर्सनीच दिली आहे. 

अ‍ॅप्लिकेशन रिसर्चर जेन मांचुन वांग यांनी याबाबतचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये मेसेंजर फंक्शन फेसबुक अ‍ॅपमध्ये अ‍ॅड झाल्याचं दिसत आहे. शेअर करण्यात आलेल्या या स्क्रिनशॉट्समध्ये फेसबुक अ‍ॅप विंडोच्या उजव्या कोपऱ्यात मेसेंजरचा आयकॉन दिसत आहे. यावर टॅप केल्यास फेसबुकची कॉन्टॅक्ट लिस्ट दिसते. मेसेंजर अ‍ॅपप्रमाणेच येथून मेसेज करण्याची सुविधा मिळत आहे. 


स्क्रिनशॉट्समधून युजर्स फेसबुक अ‍ॅपमधून देखील चॅटींग करू शकतात हे दिसत आहे. इंटीग्रेटेड फेसबुक चॅट ऑप्शनचे हे नवे फीचर मल्टीमीडिया बेल्सशिवाय  सिंपल चॅट सॉर्ट करेल तसेच इमोजीचा वापर ही करता येईल अशी माहिती मिळत आहे. जर कोणत्या युजरला व्हिडीओ अथवा व्हॉईस कॉल, फोटो पाठवू इच्छित असतील तर त्यांना मेसेंजर अ‍ॅप वेगळा डाऊनलोड करावा लागणार आहे. मात्र हे फीचर अजून अपडेट करण्यात आलेले नाही. फक्त काहीच युजर्सनी ते पाहिलं आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत. Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. 

फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. 

Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर

Facebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट

फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक काही वेळा चुकून लॉग इन राहीलं तर अनेकदा त्याचा चुकाचा वापर केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतात. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे.

- फेसबुकने दिलेले हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपलं फेसबुक अकाउंट ओपन करा. 

- ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवं पेज ओपन होईल. 

- मल्टीपल ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले असतील. त्यातील  Security & Login वर जा.

- थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Setting Up Extra Security’ चा एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

-  ‘Get Alerts about unrecognized logins’ हा पर्याय दिसेल. तसेच त्याच्यासमोर Edit चे बटण असणार आहे. 

- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे ‘Notification’, ‘Messenger’ आणि ‘Email’ हे तीन पर्याय दिसतील. 

- तिन्ही पर्यायासमोर ‘Get Notifiation’ आणि ‘Don’t Get Notifiation’ असे आणखी दोन पर्याय दिसतील.  

- यामध्ये युजर्सना  ‘Get Notifiation’ वर टिक करून Enable करावं लागेल. त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

फेसबुक संदर्भातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट दिला जाईल.  

 


Web Title: messenger like chat feature spotted on facebook app company plans to unify instagram and whatsapp soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.