शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर

By शेखर पाटील | Updated: May 23, 2018 11:17 IST

मीडियाटेक कंपनीने खास भारतीय स्मार्टफोन उत्पादकांसाठी नवीन प्रोसेसर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

मीडियाटेक कंपनीने खास भारतीय स्मार्टफोन उत्पादकांसाठी नवीन प्रोसेसर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. प्रोसेसर हा कोणत्याही स्मार्टफोनमधील महत्वाचा घटक असतो. गतीमान प्रोसेसर असल्याशिवाय कोणतेही मॉडेल खर्‍या अर्थाने चांगले काम करू शकत नाही. यामुळे बहुतांश कंपन्या नेहमी चांगला प्रोसेसर वापरण्याला प्राधान्य देतात. या पार्श्‍वभूमिवर, मीडियाटेक कंपनीने हेलीओ पी २२ हा नवीन प्रोसेसर सादर करण्याची घोषणा केली आहे. हा एसओसी (सिस्टीम ऑन चीप) १२एनएम फिनफेट या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेली जगातील पहिली चीप होय. हा ऑक्टा-कोअर चीपसेट ड्युअल कॅमेरा सेटअपला सपोर्ट करणारा आहे.

यात १३+७ मेगापिक्सल्स क्षमतांचे तसेच ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने चित्रीकरणास सक्षम असणार्‍या कॅमेर्‍यांचा वापर करता येणार आहे. अलीकडच्या काळात बहुतांश स्मार्टफोन्समध्ये आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित विविध फिचर्स देण्यात येत आहेत. या अनुषंगाने हेलीओ पी २२ हा प्रोसेसर याला सपोर्ट करणारा आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी दीर्घ काळ वापरता येणार असल्याची बाबही महत्वाची आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे अतिशय गतीमान अशा प्रोसेसींगसाठी हा प्रोसेसर उपयुक्त ठरणार आहे. याला मिड रेंज या प्रकारातील स्मार्टफोनमध्ये वापरता येणार असल्याचे मीडियाटेक कंपनीने जाहीर केले आहे.

स्मार्टफोन प्रोसेसरच्या क्षेत्रात मीडियाटेक कंपनीने आधीपासूनच भारतात विकल्या जाणार्‍या किफायतशीर व मध्यम किंमतपट्टयातील बाजारपेठेत आपला पाया मजबूत केला आहे. यात आता हेलिओ पी २२ या प्रोसेसरच्या माध्यमातून अद्ययावत फिचर्सने सज्ज असणार्‍या मॉडेल्समध्येही आपला प्रोसेसर वापरला जाईल याची तजवीज या कंपनीने केल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान