बापरे! अजून एका मोठ्या कंपनीचा डेटा लीक; McDonald's च्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची खाजगी माहिती गुन्हेगारांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 17:13 IST2021-06-14T17:12:13+5:302021-06-14T17:13:52+5:30

Mcdonald’s Data Breach: डेटाबेसमधील ब्रीचची माहिती McDonald's च्या बाह्य सल्लागार कंपनीच्या तपासणीतून समोर आली आहे.  

Mcdonald s customers employees data breached emails phone numbers delivery addresses leaked  | बापरे! अजून एका मोठ्या कंपनीचा डेटा लीक; McDonald's च्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची खाजगी माहिती गुन्हेगारांच्या हाती

बापरे! अजून एका मोठ्या कंपनीचा डेटा लीक; McDonald's च्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची खाजगी माहिती गुन्हेगारांच्या हाती

सध्या वारंवार डेटा लीक झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मोठमोठ्या कंपन्या देखील या डेटा ब्रीचला बळी पडत आहेत. यात आता जगातील प्रसिद्ध फास्ट फूड रिटेल चेन McDonald's चा समावेश झाला आहे. शुक्रवारी एका न्यूज एजन्सीने दिलेल्या बातमीनुसार, ताज्या डेटा ब्रीचमध्ये McDonald's च्या दक्षिण कोरिया आणि तैवानच्या ग्राहकांचा डेटा चोरीला गेला आहे. (Mcdonald’s South Korea and Taiwan data leaked online) 

न्यूज एजेंसी Reuters ने शुक्रवारी दिलेल्या एका रिपोर्टनुसार, दक्षिण कोरिया आणि तैवानमधील McDonald's चे ग्राहक आणि कर्मचारी यांची खाजगी माहिती असलेला डेटाबेस चारी झाला आहे. डेटाबेसमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे ई-मेल, फोन नंबर आणि डिलिवरीचा पत्ता अश्या माहितीचा समावेश आहे. ग्राहकांचे पेमेंट डिटेल्स सुरक्षित आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे.  

कंपनीच्या नेटवर्क जेव्हा अनधिकृत अ‍ॅक्टिव्हिटी दिसू लागल्या तेव्हा कंपनीने बाह्य सल्लागार कंपनीची मदत घेतली, तेव्हा या ब्रीच माहिती मिळाली. अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती मिळताच कंपनीने अ‍ॅक्सेस बंद केला अशी महती McDonald's ने दिली आहे. असे जरी असले तरी काही फाइल्स सायबर हल्लेखोरांच्या हाती लागल्या आहेत, ज्यांच्यात ग्राहकांची खाजगी माहिती आहे.  

Web Title: Mcdonald s customers employees data breached emails phone numbers delivery addresses leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.