भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:41 IST2025-07-16T11:41:02+5:302025-07-16T11:41:46+5:30

भारत सरकार आता रिलसाठी १५ हजार रुपये देणार आहे. काय आहे योजना जाणून घ्या.

Make a reel and win 15 thousand, get money from the government know the details | भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर

भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर

तुम्ही रिल बनवा सरकार तुम्हाला १५ हजार रुपये देईल, हे वाचून तुम्हाला विश्वास बसला नसेल. पण, ही बातमी खरी आहे. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया प्रोग्रॅमला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यासाठी सरकारने 'अ डिकेड ऑफ डिजिटल इंडिया-रील कॉन्टेस्ट' नावाची एक अनोखी स्पर्धा सुरू केली आहे. ही स्पर्धा १ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे आणि १ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे.

ज्यांच्या आयुष्यात डिजिटल इंडियामुळे मोठा बदल झाला आहे त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. जर ऑनलाइन सेवा, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा किंवा आर्थिक साधनांमुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असेल, तर आता ते एका सर्जनशील रीलमध्ये बदलण्याची संधी आहे.

"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी

विजेत्यांना बक्षिसे मिळतील

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना सरकार रोख बक्षिसे देत आहे. पहिल्या १० विजेत्यांना १५,००० रुपये, उर्वरित २५ सहभागींना १०,००० रुपये आणि निवडलेल्या पुढील ५० लोकांना ५,००० रुपयांचे बक्षीस मिळेल.

या गोष्टी असाव्यात

रील किमान १ मिनिटाची असावी. व्हिडीओ मूळ असावा आणि कधीही पोस्ट न केलेला असावा. तुम्ही तो हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही भारतीय भाषेत बनवू शकता. रील पोर्ट्रेट मोडमध्ये आणि MP4 स्वरूपात असावी. तुमचा व्हिडीओ डिजिटल इंडियाने तुमचे जीवन कसे बदलले आहे यावर आधारित असावा, या गोष्टी रील बनवताना लक्षात ठेवाव्यात.

रील कुठे अन् कशी पाठवायची

तुम्हाला या स्पर्धेशी संबंधित सर्व माहिती आणि रील अपलोड करण्याची लिंक सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest वर मिळेल.

२०१५ मध्ये सुरू झालेल्या डिजिटल इंडिया प्रोग्रॅमने आज खेड्यांपासून शहरांपर्यंतच्या लोकांना तंत्रज्ञानाने जोडले आहे. ऑनलाइन सरकारी सेवा आणि डिजिटलायझेशनमुळे पारदर्शकता वाढली आहे. डिजिटल आरोग्य नोंदी, आधार लिंक सेवा, यूपीआय व्यवहार यासारख्या गोष्टी त्याचे यश दर्शवितात. आता सरकारला जनतेने त्यांच्या यशस्वी गोष्टींनी हे यश साजरे करायचे आहे. जर तुमच्याकडेही डिजिटल इंडियाची प्रेरणादायी कथा असेल तर तुम्ही ती रील बनवून पाठवू शकता.

Web Title: Make a reel and win 15 thousand, get money from the government know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.