Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय व्हॉइस क्लोनिंग : मशीन तुमच्या आवाजात कसे बोलते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 15:03 IST2026-04-12T15:01:49+5:302026-04-12T15:03:01+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: हे नेमकं कसं घडतं ते समजून घेऊया...

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय व्हॉइस क्लोनिंग : मशीन तुमच्या आवाजात कसे बोलते?
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आवाजात नवीन संदेश ऐकू येतो. काही वेळा तर आपल्याच आवाजात एआय बोलताना दिसतो ! हे शक्य होतं ते एआय व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञानामुळे. म्हणजेच मशीन एखाद्या व्यक्तीचा आवाज शिकून त्याच्यासारखा आवाज तयार करते. पूर्वी आवाजाची नक्कल करणे म्हणजे मिमिक्री कलाकारांचे काम होते; पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता काही सेकंदांचा आवाज ऐकून त्याची शैली, टोन, वेग, चढ-उतार शिकते आणि तसाच नवीन आवाज तयार करते. हे नेमकं कसं घडतं ते समजून घेऊया...
आवाजाचे नमुने गोळा करणे
सर्वप्रथम AI ला त्या व्यक्तीचा आवाज ऐकवला जातो. हा आवाज स्वच्छ, स्पष्ट आणि वेगवेगळ्या शब्दांनी भरलेला असावा लागतो.
AI खालील गोष्टी ओळखतो -
आवाजाची पट्टी (Pitch).
बोलण्याचा वेग.
शब्दांतील जोर.
नैसर्गिक विराम.
हा टप्पा म्हणजे मशीन "ऐकून शिकते".
सुरक्षिततेचा प्रश्न
हे तंत्रज्ञान जितके शक्तिशाली आहे तितके धोकादायकही ठरू शकते. जसे की, खोटे ऑडिओ तयार होऊ शकतात. फसवणूक (Scam calls) वाढू शकतात. चुकीची माहिती पसरू शकते. म्हणूनच Voice Cloning वापरताना कायदेशीर आणि नैतिक नियम महत्त्वाचे आहेत.
आवाजाचा डिजिटल नकाशा तयार करणे
आवाज म्हणजे हवेतील कंपन (sound waves).
AI त्या कंपनांचे विश्लेषण करून एक Voice Pattern Model तयार करतो.
Deep Learning मॉडेल आवाजातील सूक्ष्म वैशिष्ट्ये पकडते. जसे की, घोगरा की मऊ? गंभीर की हलका? भावनिक की सपाट ?
हा नकाशा म्हणजे त्या व्यक्तीचा "डिजिटल आवाजाचा ठसा" (Voiceprint). आहे.
भविष्याचा विचार
आगामी काळात प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा 'डिजिटल व्हॉइस आयडी' असेल. शिक्षण, मीडिया, व्यवसाय, कॉल सेंटर, मनोरंजन सर्व क्षेत्रांत AI आवाजाचा वापर वाढेल. पण त्याच वेळी जबाबदारीही तितकीच वाढेल.
नवीन मजकूर जुना आवाज
तुम्ही नवीन मजकूर लिहिता. आणि AI त्या मजकुराला ध्वनीत बदलतो आणि आधी शिकलेल्या आवाजाच्या स्टाइलमध्ये आपल्याला सादर करतो. म्हणजे, तुम्ही न बोलताही, AI तुमच्यासारखं बोलू शकतो !
Cloning the Human Voice
Al voice cloning learns the unique sound patterns of a person and generates new speech in the same style. It is powerful, creative, but must be used responsibly. Technology can copy your voice, but only you control your values.
उपयोग कुठे होतो?
चित्रपट डबिंग
ऑडिओ बुक
गेमिंग पात्रांचे आवाज
वैद्यकीय मदत (ज्यांचा आवाज गेला आहे त्यांच्यासाठी) वैयक्तिक AI सहायक.
कल्पना करा, एखाद्या शिक्षकाचा डिजिटल आवाज कायम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे!
- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)