शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: AI आणि गोपनीयता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:47 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: सतर्क राहणे गरजेचे आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत असताना गोपनीयता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. एआय काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा वापरतो आणि हाच डेटा आपली वैयक्तिक माहितीही असू शकतो. एआय प्रणाली हा डेटा वापरून आपल्या सवयी, आवडी-निवडी, विचारसरणी आणि वर्तना यांचे विश्लेषण करतो. यालाच 'प्रोफाइलिंग' असे म्हणतात. या प्रोफाइलिंगचा उपयोग योग्य सेवा देण्यासाठी होऊ शकतो; पण त्याच वेळी चुकीच्या जाहिराती, दिशाभूल करणारी माहिती किंवा फसवणूक यासाठीही तो वापरला जाऊ शकतो.

आज फेस रिकग्निशन (Face Recognition) आणि व्हॉइस क्लोनिंग (Voice Cloning) सारख्या तंत्रज्ञानामुळे डिपफेक (Deepfake) व्हिडीओ, बनावट ऑडिओ कॉल आणि खोटे पुरावे तयार करणे शक्य झाले आहे, जे व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, सुरक्षिततेला आणि लोकशाही व्यवस्थेलाही धोका निर्माण करू शकते.

विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हा धोका अधिक गंभीर आहे. कारण गेम्स, शिक्षण अॅप्स आणि ऑनलाइन व्यासपीठांमधून (प्लॅटफॉर्म्स) त्यांचा डेटा नकळत गोळा होतो; पण त्याची जाणीव ना मुलांना असते, ना पालकांना स्पष्टपणे दिली जाते. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.

गोपनीयतेचा हक्क (Right to Privacy) 

सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेला मूलभूत हक्क मानले आहे.

विद्यार्थ्यांसाठी संदेश

AI वापरकर्ते न बनता, AI समजून घेणारे जागरुक नागरिक बना. आपली माहिती कुठे, कशी आणि का वापरली जाते, हे जाणून घेणे हीच खरी डिजिटल साक्षरता आहे.

एआय गोपनीयतेशी कसा जोडलेला आहे?

- AI प्रणाली खालील प्रकारचा डेटा वापरतात!- नाव, मोबाइल क्रमांक, ठिकाण (लोकेशन).- छायाचित्र (फोटो), आवाज, व्हिडीओ.- इतिहास, सोशल मीडियावरील वर्तन.- आरोग्य, शिक्षण, आर्थिक माहिती.- हा डेटा योग्य प्रकारे संरक्षित नसेल तर गोपनीयतेला धोका निर्माण होतो.

भारतात गोपनीयतेचे संरक्षण

Digital Personal Data Protection Act (2023)नागरिकांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्यासाठीचा कायदा.

एआयमुळे निर्माण होणारे सुरक्षिततेचे धोके

- डेटा गळती (डेटा लिक).- निगराणी (सव्हिलन्स).- चेहऱ्याची ओळख (Face Recognition).- परवानगीशिवाय डेटाचा वापर.

Rohan loved playing online games and using apps. One day, he saw ads and messages that seemed to know too much about him-his location, favorite games, even his daily routine. He felt scared and told his teacher. "Al uses your data," the teacher said. "If you share too much, it can be misused." Rohan changed his privacy settings, shared only what was needed, and started thinking before clicking anything. Slowly, he learned that Al can help, but only if you stay careful.

Moral: Think before you share -your privacy is important. - Ajinkya Deshmukh

AI मध्ये गोपनीयता कशी जपता येईल?

- डेटा मर्यादा (Data Minimization) -आवश्यक तेवढाच डेटा वापरणे.- एनक्रिप्शन (Encryption) - डेटा सुरक्षित स्वरुपात साठवणे.- परवानगी (Consent) -वापरकर्त्याची माहितीपूर्वक संमती.- पारदर्शकता - डेटा कसा वापरला जातो हे स्पष्ट सांगणे.- नैतिक AI (Ethical Al) -माणसाच्या हक्कांचा आदर करणारी प्रणाली.

इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर) 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Exploring the World of AI and Privacy

Web Summary : AI's rise brings privacy concerns. Data use for profiling can be misused. Face recognition poses threats. The Digital Personal Data Protection Act (2023) protects citizens' data. Ethical AI and data minimization are crucial.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमत