शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 10:26 IST

लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे.मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे.ट्विटरचा हा खास इमोजी 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे. तसेच सोशल मीडियाने निवडणूक आयोगाच्या जागरूकता कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. ट्विटरचा हा खास इमोजी 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये भारताच्या संसदेचा एक फोटो फीचर करण्यात आला आहे. 

ट्विटरने लोकसभा निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी पुढे ठेवण्यासाठी एका खास इमोजीची (भावनात्मक संकेत चिन्ह) सुरुवात केली आहे. निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे. मतदानासंदर्भात त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ट्वीटरने म्हटले आहे.

17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत.

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचरसोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. 

ट्वीटरचे संचालक जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात. ट्वीटरवर आतापर्यंत असे फीचर का नव्हते असे विचारले असता  'ट्वीटरची निर्मिती SMS म्हणजेच मेसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो रद्द करता येत नाही. त्याचप्रमाणे एकदा ट्वीट केल्यानंतर ते ट्वीट जगभरात पोहोचते' असे डोर्से यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून ट्वीटरमध्ये एडीटचे पर्याय उपलब्ध करुन द्या, अशी मागणी अनेक युजर्सने केली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTwitterट्विटर