घरातली विद्युत उपकरणे आता कुठूनही बंद-सुरू करा एका क्लिकवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 02:50 PM2018-03-14T14:50:46+5:302018-03-14T14:51:47+5:30

या अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणतेही उपकरण सुरू राहिल्यास ते तुम्ही कुठूनही बंद करू शकणार आहात.

Loacted app for remote switch on and off electric devices in home | घरातली विद्युत उपकरणे आता कुठूनही बंद-सुरू करा एका क्लिकवर!

घरातली विद्युत उपकरणे आता कुठूनही बंद-सुरू करा एका क्लिकवर!

Next

मुंबई: अरे रे..एसी बंद करायचा राहिला.. आतल्या खोलीतला दिवाही बंद करायला विसरलो किंवा विसरले अशी हळहळ व्यक्त करणारी वाक्यं कानावर अधूनमधून पडत असते. मात्र, अशा विसरण्याच्या सवयीला कायमचा पूर्ण विराम देण्यासाठी चेतन बाफना यांनी ‘लोकेटेड’ नावाचे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणतेही उपकरण सुरू राहिल्यास ते तुम्ही कुठूनही बंद करू शकणार आहात. एवढेच नव्हे तर अॅपच्या मदतीने बाहेरून घरी जाताना घरी पोहोचण्यापूर्वीच तुम्ही एसी सुरू करून आपली खोली थंडगार करू शकणार आहात.

सध्या मुंबई शहरात ओमकार, रहेजा युनिव्हर्सल, सनसिटी डेव्हलपर्स, सीबीआरई, नीलम रिएलटर्स, पीएसआयपीएल (कल्पतरू ग्रुप कंपनी) या संकुलात ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत दहा हजार लोकांनी  ‘लोकेटेड’ अॅप डाऊनलोड केले आहे. नव्या काळानुसार तंत्रज्ञानात बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य लोकांना फायदा व्हावा, वेळेची बचत व्हावी, याकरता हे ‘लोकेटेड’ अॅप विकसित करण्यात आहे. जगण्याचा वेग इतका वाढला आहे की, अनेकदा घरातले अनेक महत्त्वाचे उपकरण बंद करण्यास लोक विसरतात, अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशावेळी ‘लोकेटेड’ अॅप अतिशय उपयोगाचे ठरू शकते असे लोकेटेडचे ​संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन बाफना यांनी सांगितले.

 ‘लोकेटेड’ अॅप कसे चालते
आयोटी तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकटेडची संपूर्ण यंत्रणा चालते. घरात एक डिव्हाइस बसवले जाते. त्यावर सेंसर्स असतात. जे विद्युत उपकरणाला जोडले जातात. इंटरनेटच्या माध्यमातून त्याला कंट्रोल केले जाते. एखादं उपकरण सुरू राहिल्यास ते बंद करण्याचा पर्याय देण्यात येतो. तसेच एखादं उपकरण सुरू करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही प्रणाली सध्या संकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून प्ले स्टोअरवर लोकेटेड अॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.
 

Web Title: Loacted app for remote switch on and off electric devices in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.