अरारारा खतरनाक! फक्त 1 रुपयांमध्ये घर आणा LLOYD चा AC, अशी आहे Summer ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 19:27 IST2022-04-19T19:27:37+5:302022-04-19T19:27:57+5:30
LLOYD कंपनीनं नव्या सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये अनेक ऑफर दिल्या जात आहेत. यातील एक ऑफर फक्त एक रुपयांत तुम्हाला नवा AC मिळवून देईल.

अरारारा खतरनाक! फक्त 1 रुपयांमध्ये घर आणा LLOYD चा AC, अशी आहे Summer ऑफर
LLOYD कंपनीनं नव्या सेलची सुरुवात केली आहे. Lloyd Great Summer Bonanza सेल या महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थात 30 एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. यात कंपनीनं 5 वेगवेगळ्या ऑफर्सची घोषणा केली आहे. जर तुम्ही देखील गर्मीपासून वाचण्यासाठी एक नवीन AC विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.
LLOYD कंपनी आपल्या निवडक एसी मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर्स देत आहे. यातील पहिली ऑफर अशी आहे की तुम्ही कंपनीचा एसी फक्त 1 रुपया देऊन घरी आणू शकता. दुसऱ्या ऑफरमध्ये तुमच्या खरेदीवर तुम्हाला 15 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. तिसरी ऑफर फक्त 699 रुपयांमध्ये एसी इंस्टॉलेशन करून देते. चौथ्या ऑफर अंतर्गत जुना एसी एक्सचेंज केल्यास 5,000 रुपयांची सूट मिळेल. शेवटची ऑफर 4 वर्षांपर्यंत मोफत वॉरंटी मिळवून देते.
फक्त 1 रुपयांमध्ये AC
ही LLOYD नं सादर केलेली AC फायनान्सिंग ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त एक रुपया देऊन AC घरी आणू शकता आणि उर्वरित रक्कम तुम्ही EMI मध्ये देऊ शकता. ही ऑफर LLOYD च्या निवडक मॉडेल्स आणि स्टोर्सवरच उपलब्ध आहे.या सर्व ऑफर्स 30 एप्रिल पर्यंत वैध असतील. तसेच प्रत्येक ऑफरसाठी काही नियम आणि अटी आहेत, त्यामुळे जर तुम्ही एसी विकत घेण्याचा विचार करत असला तर त्यांची पूर्णपणे माहिती घ्यावी.