शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

LG ने भारतात लॉन्च केला Ai Smart TV; किंमत ऐकून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:56 IST

LG ने OLED evo आणि QNED evo सीरिज आणली आहे.

जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG ने भारतीय बाजारात आपला नवीन Ai स्मार्ट टीव्ही लाॉन्च केला आहे. कंपनीने याचे ४३ इंच ते ९७ इंच...असे वेगवेगळे मॉडेल्स आणले आहेत. विशेष म्हणजे, याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. हे मॉडेल ९७ इंच आकारात येतो.  कंपनीने OLED evo आणि QNED evo सीरिज आणली आहे. या सीरिजमध्ये तुम्हाला अधिकाधिक प्रीमियम फिचर्स मिळतात. यात खास Ai फिचर आहेत, जे या स्मार्ट टीव्हीला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. 

फास्ट प्रोसेसर...या टीव्हीची खासियत म्हणजे, युजर कसा संवाद साधतो, याचे आकलन करुन टीव्ही तशाच प्रकारचा कंटेट सुचवतो. दोन्ही व्हेरिएंटमध्ये कंपनीने Ai एन्हांसमेंट, प्रगत डिस्प्ले तंत्रज्ञान आणि अपडेटेड वेबओएस दिले आहे.  कंपनीने २०२५ च्या OLED evo आणि QNED evo TV मध्ये Alpha AI Gen 2 प्रोसेसर दिला आहे. यामुळे तुम्हाला चांगले कस्टमायझेशन आणि स्मार्ट कंट्रोल्स मिळतील. कंपनीने AI मॅजिक रिमोटमध्ये एक वेगळे AI बटण दिले आहे, जे व्हॉइस कंट्रोल आणि नेव्हिगेशनसाठी वापरले जाऊ शकते.

स्मार्ट Ai फिचर्सहा स्मार टीव्ही, युजरला त्याच्या आवडीचा कंटेट दाखवेल आणि कीवर्डही सुचवेल. यातील Ai फिचर लार्ज लँग्वेज मॉडेलवर तयार केले आहे. टीव्हीमध्ये दिलेला AI चॅटबॉट रिअल टाइममध्ये समस्या शोधतो आणि त्याचे निराकरण करतो. या टीव्हीमध्ये एक नवीन webOS आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक नवीन डिझाइन केलेला होम स्क्रीन मिळेल, जे मल्टी युजरला सपोर्ट करेल. शिवाय, यात इंटीग्रेटेड Apple AirPlay आणि Google Cast आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा कंटेट टीव्हीवर शेअर करू शकता.

किंमत किती..?कंपनीने QNED AI टीव्ही ७४,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला आहे. या टीव्हीमध्ये ४३-इंच ते ७५-इंच स्क्रीन साईजचा पर्याय आहे. तर, QNED evo सीरिज (QNED8GA / XA) १,१९,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. तुम्ही OLED evo ची C5 सीरिज १,४९,९९० रुपयांना, G5 सीरिज २,६७,९९० रुपयांना आणि G5 अल्ट्रा-लार्ज टीव्ही सीरिज २४,९९,९९० रुपयांना खरेदी करू शकता. ही किंमत ९७-इंच स्मार्ट टीव्हीसाठी आहे.

टॅग्स :LGएलजीtechnologyतंत्रज्ञानIndiaभारतbusinessव्यवसाय