मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद! वाचवण्यासाठी १ जानेवारीपूर्वी करा 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 01:53 PM2023-12-27T13:53:35+5:302023-12-27T13:55:29+5:30

मायक्रोसॉफ्टने लॅपटॉपच्या विंडोज १० सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे २४० मिलियन पीसी काम करणार नाहीत. या निर्णयामुळे अंदाजे ४८० मिलियन किलोग्रॅम ई-कचरा तयार होईल. लॅपटॉप वाचवण्यासाठी विंडोजचे नवीन व्हर्जन अपडेट करा.

lenovo dell laptop will not work from 1st january microsoft windows 10 update not issue | मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद! वाचवण्यासाठी १ जानेवारीपूर्वी करा 'हे' काम

मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद! वाचवण्यासाठी १ जानेवारीपूर्वी करा 'हे' काम

मायक्रोसॉफ्टने एका मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अनेकांना तोटा होऊ शकतो. या निर्णयामुळे तुमचा लॅपटॉप बंद होऊ शकतो.आता वेळेनुसार काही बदलही करायला हवेत. बदल केला तरच तुमचे लॅपटॉप वाचणार आहेत. अनेक लोकांचे लॅपटॉप फेब्रुवारीपर्यंत बंद होऊ शकतात.

मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 सपोर्ट पूर्णपणे बंद करणार आहे. आता अशा परिस्थितीत तुमचा लॅपटॉप अजिबात अपडेट होणार नाही आणि तुम्हाला नवीन सॉफ्टवेअर आणि बदल मिळणार नाहीत. हे टाळण्यासाठी तुम्ही विंडोज व्हर्जन बदलू शकता. नवीन अपडेट केले तरच तुमचा लॅपटॉपही सुरक्षित राहू शकतो. 

सरकारसाठी ही एक मोठी समस्या असू शकते कारण यामुळे भरपूर ई-कचरा तयार होईल आणि सरकार तो टाळण्याचाही विचार करत आहेत. या एका निर्णयामुळे सुमारे ४८० मिलियन किलोग्रॅम कचरा तयार होऊ शकतो. कारण यामुळे, सुमारे २४० मिलियन पीसी पूर्णपणे निरुपयोगी होणार आहेत. पैसे वाचवण्यासाठी, तुम्ही आधी तुमच्या PC ची Windows व्हर्जन अपडेट केले पाहिजे.

मायक्रोसॉफ्ट आता आपला फोकस बदलणार आहे.  कंपनी विंडोजच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे. याच्या मदतीने कंपनी आपल्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये नवीन फीचर्स जोडणार आहे. यामुळेच मायक्रोसॉफ्टला विंडोजच्या जुन्या व्हर्जनवर जास्त वेळ घालवायचा नाही. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. पण तुमचा पीसी वाचवण्यासाठी तुम्ही आजच विंडोजचे व्हर्जन  बदलली पाहिजे. त्यामुळे १ जानेवारीपूर्वी तुम्ही तुमचा पीसी अपडेट करा.

Web Title: lenovo dell laptop will not work from 1st january microsoft windows 10 update not issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.