शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

विवोचे ई-स्टोअर सुरू; विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती

By शेखर पाटील | Published: January 16, 2018 11:19 AM

विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपले ई-स्टोअर सुरू केले असून पहिल्या तीन दिवसांमध्ये लाँच कार्निव्हलच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. विवो कंपनीने भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली आहे. अन्य चीनी कंपन्यांप्रमाणे किफायतशीर दरात उत्तमोत्तम स्मार्टफोन्स सादर करण्यास विवोने प्राधान्य दिले आहे. याच्या जोडीला विवोने देशाच्या कान्याकोपर्‍यात आपल्या ...

विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपले ई-स्टोअर सुरू केले असून पहिल्या तीन दिवसांमध्ये लाँच कार्निव्हलच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. विवो कंपनीने भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली आहे. अन्य चीनी कंपन्यांप्रमाणे किफायतशीर दरात उत्तमोत्तम स्मार्टफोन्स सादर करण्यास विवोने प्राधान्य दिले आहे. याच्या जोडीला विवोने देशाच्या कान्याकोपर्‍यात आपल्या विक्रेत्यांचे जाळे विणले आहे. शाओमी आणि वन प्लस सारख्या कंपन्यांनी पहिल्या टप्यात ऑनलाईन विक्रीचा पॅटर्न यशस्वीपणे राबविला होता. तर याच्या अगदी उलट विवोसह ओप्पो, जिओनी आदी कंपन्यांनी ऑफलाईन विक्रीला प्राधान्य दिले होते. यथावकाश या सर्व कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीतंत्राची समतोल प्रणाली विकसित केली आहे.

या अनुषंगाने विवो कंपनीने आपले ई-स्टोअर सुरू केले आहे. अर्थात यावरून विवो कंपनीची सर्व उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. विवो ई-स्टोअर सुरू करतांना कंपनीने १६ ते १८ जानेवारीच्या दरम्यान लॉचींग कार्निव्हलची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. याच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर २ हजारापर्यंतची सलवत मिळणार आहे. याशिवाय ग्राहकाला बुक माय शो तर्फे ५०० रूपयांचे व्हाऊचरदेखील मिळणार आहे. १० विजेत्यांना कंपनीचा ब्ल्यु-टुथ स्पीकर भेट म्हणून मिळणार आहे. तर विवो व्ही७ आणि व्ही७ प्लस या मॉडेल्सवर मोफत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. याच्या सर्व मॉडेल्सवर झीरो कॉस्ट इएमआयची सुविधा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देशभरातील तब्बल १० हजार पीनकोडच्या क्षेत्रात विवो कंपनी ग्राहकांना उत्पादने थेट त्यांच्या घरी पोहचवणार आहे. कुणीही विवो कंपनीच्या ई-स्टोअरला (http://shop.vivo.com/in) भेट देऊन या विविध ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

टॅग्स :Vivoविवोtechnologyतंत्रज्ञान