चार्जरमधील या प्लास्टिक सिलेंडरचा उपयोग काय माहित आहे का?
By सिद्धेश जाधव | Updated: September 14, 2021 18:30 IST2021-09-14T18:29:24+5:302021-09-14T18:30:53+5:30
लॅपटॉप चार्जरच्या टोकावरील प्लास्टिक सिलेंडरचा उपयोग काय? त्याचे नाव काय? जाणून घ्या.

चार्जरमधील या प्लास्टिक सिलेंडरचा उपयोग काय माहित आहे का?
सध्या लोक लॅपटॉपचा वापर करतात, परंतु लॅपटॉपच्या प्रत्येक गोष्टीकडे आपले लक्ष नसते. प्रत्येक पोर्ट, बटन, सेटिंग आपण वापरतोच असे नाही. त्याचप्रमाणे तुमचे लक्ष लॅपटॉपच्या चार्जरच्या टोकावरील एका प्लास्टिक सिलेंडरसारख्या वस्तूवर देखील गेले असेल. अनेकांना हा प्लास्टिक पार्ट अनावश्यक वाटतो, काही लोक चार्जरचे टोक आपटू नये म्हणून हा सिलेंडर दिला असेल असा अंदाज लावतात. परंतु असे काहीही नाही, या सिलेंडर सारख्या पार्टच्या मागे खास कारण असते. चला जाणून घेऊया ते कारण
याचे नाव काय
या सिलेंडर सारख्या दिसणाऱ्या वस्तूला फेराइट बीड किंवा फेराइट चॉक किंवा फेराइट सिलेंडर असे म्हणतात. इतकेच नव्हे तर हा पार्ट ब्लॉक्स, कोर्स, रिंग्स, ईएमआय फिल्टर्स किंवा चॉक्स या नावाने देखील ओळखला जातो. या फेराइट बीडचा वापर प्रामुख्याने कंप्यूटर टेक्नॉलॉजीसंबंधित गॅजेट्समध्ये केला जातो. हा लॅपटॉप चार्जरचा महत्वपूर्ण भाग आहे. हा फेराइट बीड मॉनीटर, प्रिंटर, व्हिडीओ कॅमेरा, एचडीएमआय केबल आणि अशाच इतर कंप्यूटर उपकरणांच्या केबलमध्ये लावण्यात येतो.
फेराइट बीडचा उपयोग काय
ज्या फेराइट बीडला तुम्ही निरूपयोगी समजत आहात तो एक इंडक्टर होता आहे. कोणत्याही सर्किटमध्ये येणारी फ्रिक्वेंसी नॉइज कमी करणे, हे याचे मुख्य काम आहे. किंवा असे देखील म्हणता येईल कि, याचे काम फेराइट बीड हाय फ्रिक्वेंसी नॉइज कंप्रेस करण्याचे असते. हा फेराइट सिलेंडर लॅपटॉपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइजपासून वाचवतो.
अँटेन्याचे देखील काम करतो
जर एखादा डिवाइस रेडियो फ्रीक्वेंसी निर्माण करत असेल तर ही केबल एका अँटेनाप्रमाणे चालतो. हा बीड तुमच्या उपकरणातून निघणारी रेडियो फ्रीक्वेंसी रोखतो आणि आणि इतर उपकरणांची रेडियो फ्रीक्वेंसी तुमच्या गॅजेट पर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे आजूबाजूच्या उपकरणांची रेडियो अॅक्टिव्ह एनर्जी तुमच्या उपकरांवर परिणाम करत नाही. असे जर झाले असते तर तुमच्या कम्प्यूटर किंवा लॅपटॉपची स्क्रीन हलू लागली असती.