शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहीत आहेत का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 11:49 IST

फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फाचर्स आणत असतं.

नवी दिल्ली - फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जगभरातील कोट्यवधी युजर्स रोज फेसबुकचा वापर करतात. फेसबुकमध्ये काही सीक्रेट ट्रिक्स आहेत. मात्र कमी लोकांना त्याबाबत माहिती आहे. या ट्रिक्सच्या मदतीने फेसबुकवरील चॅटिंग आणखी मजेशीर करता येतं. 

जास्त पोस्ट करणाऱ्या फ्रेंडला स्नूज करा

फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये अशी एक व्यक्ती असते की ती सतत फेसबुकवर पोस्ट शेअर करत असते. मात्र नेहमीच त्या व्यक्तीच्या पोस्ट पाहून कंटाळा येतो. पण मित्र असल्याने अनफ्रेंड करता येत नाही. अशा युजर्ससाठी स्नूजचा पर्याय बेस्ट आहे. याच्या मदतीने फेसबुकवर जास्त पोस्ट करणाऱ्या फ्रेंडला स्नूज करता येतं.

बर्थडे नोटिफिकेशन्स बंद करा

फेसबुकवर बर्थडे नोटिफिकेशन्स मिळतं. त्यामुळेचं मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचा वाढदिवस हा लक्षात राहतो. फ्रेंडलिस्टमध्ये आज कोणत्या व्यक्तीचा वाढदिवस आहे याची माहिती फेसबुक युजर्सना देत असतं. मात्र अनेकदा नको असलेल्या व्यक्तीच्या वाढदिवसाचं देखील नोटिफिकेश येतं. फेसबुकवर हे फीचर बाय डिफॉल्ट ऑन असतं. त्यामुळे नको असल्यास सेटिंग्समध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑप्शनमध्ये बर्थडे नोटिफिकेशन टर्न ऑफ करा. 

फेसबुक डेटा डाऊनलोड करा

फेसबुक युजर्सना त्यांचा पूर्ण डेटा हा डाऊनलोड करता येतो. डाऊनलोड करण्यासाठी सेटिंगमध्ये गेल्यावर Your Facebook Information चा पर्याय मिळेल.  यावर क्लिक केल्यास Download Your Information चा एक पर्या मिळेल. त्यावरून युजर्स सर्व डेटा डाऊनलोड करू शकतात. 

अ‍ॅप इन्वाइट्स आणि गेम रिक्वेस्ट बंद करा

 

फेसबुकवर रोज नवीन अ‍ॅप इन्वाइट्स आणि गेम रिक्वेस्ट येत असतात. या रिक्वेस्टचा कंटाळा आला असेल तर ते युजर्स बंद करू शकतात. सेटिंगमध्ये ब्लॉकिंग ऑप्शनवर क्लिक करा. खाली स्क्रोल केल्यानंतर ब्लॉक अ‍ॅप इन्व्हाईटचा पर्याय मिळेल. 

फेसबुक मेसेजवर Seen बंद करा

चॅटिंग करत असताना समोरच्या व्यक्तीला तुम्ही चॅट अथवा मेसेज वाचला हे समजू नये असं वाटत असेल तर त्यांना फेसबुकने एक पर्याय दिला आहे. यासाठी युजर्सना Unseen for Facebook Chrome extension डाऊनलोड करावं लागेल. हे इन्स्टॉल केल्यानंतर ब्राऊजर टूल बारमध्ये देण्यात आलेल्या मेसेंजर आयकॉनवर टॅप करा आणि ते ऑन करा. 

ऑनलाईन स्टेटस इतरांपासून लपवा

फेसबुकवर एक खास फीचर आहे ज्याच्या मदतीने काही लोकांपासून ऑनलाईन स्टेटस ब्लॉक करण्यासोबतच त्यांचे मेसेजही ब्लॉक करता येतात. यासाठी सेटिंग्समध्ये देण्यात आलेल्या ब्लॉकिंग ऑप्शनमध्ये जा. ब्लॉक युजर्सचा एक सेक्शन मिळेल. ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचं आहे त्यांचं नाव टाईप करा.  

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल