शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

इन्स्टाग्राम मुलींसाठी धोकादायक ठरतंय का? कसं होतंय नुकसान?, अहवालात धक्कादायक माहिती समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:53 IST

फेसबुक लवकरच लहान मुलांसाठी इन्स्टाग्राम अ‍ॅप लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली होती. फेसबुक सध्या इन्स्टाग्रामसाठी एका नव्या व्हर्जनवर काम करत असून हे अ‍ॅप खास १३ वर्षांखालील मुलांसाठी असणार आहे.

फेसबुक लवकरच लहान मुलांसाठी इन्स्टाग्राम अ‍ॅप लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली होती. फेसबुक सध्या इन्स्टाग्रामसाठी एका नव्या व्हर्जनवर काम करत असून हे अ‍ॅप खास १३ वर्षांखालील मुलांसाठी असणार आहे. पण फेसबुकनं आता 'इन्स्टाग्राम किड्स'ची योजना थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत या योजनेला कडाडून विरोध होत आहे त्यामुळेच फेसबुकनं योजना थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

इन्स्टाग्राम किड्सला नेमका विरोध का केला जातोय? यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. हे अ‍ॅप लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यात मुलींसाठी अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. त्यासंबंधीचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 

वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रकाशित केलेल्या एका अहवालानंतर मोठा धुमाकूळ उडाला आहे. यात इन्स्टाग्रामुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुख्यत्वे मुलींवर अधिक परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. इन्स्टाग्राममुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे आणि त्यांना 'बॉडी इमेज'चा त्रास होऊ लागला आहे. काहींमध्ये तर इंटिंग डिसऑर्डरची समस्या देखील निर्माण झाली आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

मुलींवर काय होतोय परिणाम?फेसबुकच्या अंतर्गत स्त्रोतांतून समोर आलेल्या माहितीनुसार अ‍ॅपमध्ये प्रत्येकी पैकी एका अल्पवयीन मुलीला बॉडी इमेजच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं आहे. जवळपास १३ टक्के ब्रिटीश आणि ६ टक्के अमेरिकन अल्पवयीन युझर्सचा सर्व्हे यात करण्यात आला आहे. यासोबतच डिप्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचीही तक्रार मुलींनी केली आहे. 

दरम्यान, इन्स्टाग्रामनंही यावर प्रतिक्रिया दिली असून संबंधित अहवाल हा मोजक्या सॅम्पलवर आधारित आहे. हा अत्यंत सूक्ष्म सर्व्हे होता आणि आम्ही त्यामाध्यमातून युझर्सला येणाऱ्या समस्यांची माहिती घेत होतो. सोशल मीडियाचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. अनेकांना याचं नुकसान होतं, तर अनेकांना याचा फायदा देखील होतो. याशिवाय इन्स्टाग्रामचं हेही म्हणणं आहे की, इन्स्टाग्रॅम अॅप सध्या कोट्यवधी युझर्स वापर करत आहेत. त्यामुळे मोजक्या लोकांचा सल्ला पूर्णपणे योग्य आहे असं मानता येणार नाही. 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान