Karbonn ने केली कमाल! फक्त 7,990 रुपयांमध्ये मेड इन इंडिया Smart TV लाँच
By सिद्धेश जाधव | Updated: October 30, 2021 17:41 IST2021-10-30T17:41:13+5:302021-10-30T17:41:28+5:30
Smart TV Under 10000: भारतीय कंपनी Karbonn ने आपला एक स्वस्त Smart TV भारतात लाँच केला आहे. हा स्मार्ट टीव्ही रिलायन्स डिजिटलच्या माध्यमातून विकत घेता येईल.

Karbonn ने केली कमाल! फक्त 7,990 रुपयांमध्ये मेड इन इंडिया Smart TV लाँच
Smart TV Under 10000: भारतीय मोबाईल निर्माता कंपनी Karbonn ने आता Smart TV सेगमेंटमध्ये पदार्पण केले आहे. आतापर्यंत स्मार्टफोन आणि फिचर फोनसाठी ओळखली जाणारी ही कंपनी आता स्वस्त स्मार्ट टीव्ही घेऊन आली आहे. कार्बनने दिवाळीच्या आधी एक स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. हा स्मार्ट टीव्ही रिलायन्स डिजिटलच्या माध्यमातून विकत घेता येईल.
सध्या कार्बनचे पाच टीव्ही मॉडेल्स उपलब्ध आहेत. कंपनी आगामी दोन वर्षात अजून 10 मॉडेल्स जोडणार आहे. Karbonn ने KJW39SKHD, KJW32SKHD आणि KJWY32SKHD हे तीन स्मार्ट एलईडी टीव्ही मॉडेल्स सादर केले आहेत. तर KJW24NSHD आणि KJW32NSHD हे दोन एलईडी मॉडेल्स आहेत.
कार्बन स्मार्ट टीव्हीचे फीचर्स
KJW32SKHD स्मार्ट एलईडी टीव्ही बेजल्स-लेस डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. यात बिल्ट-इन अॅप स्टोर देण्यात आला आहे, त्यामुळे विविध अॅप वापरता येतील. तसेच अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेन्टचा आस्वाद देखील या टीव्हीवर घेता येईल. स्मार्ट एलईडी टीव्ही मध्ये एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीला मल्टीपल डिवाइस कनेक्ट करता येतील. या टीव्ही मध्ये युजर्सना प्री-इंस्टॉल्ड मुव्ही बॉक्स मिळेल त्यामुळे युजर्सना अनेक मुव्हीज बघता येतील. या स्मार्ट टीव्हीमधील ऑडिओ आणि साउंड इफेक्ट्स घरातच थिएटर सारखा अनुभव देतील, असा दावा कंपनीने केला आहे.
कार्बन टीव्हीची किंमत
कार्बन स्मार्ट टीव्हीची किंमत 7,990 रुपये आहे. ही किंमत 24 इंचाच्या मॉडेलची आहे. या सीरिजमधील सर्वात मोठा 39 इंचाचा मॉडेल 16, 990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 32 इंचाच्या स्मार्ट टीव्ही मॉडेलची किंमत 10,990 ठेवण्यात आली आहे. तर 32 इंचाच्या एलईडी मॉडेलची किंमत 9,990 रुपये आहे.