जबरदस्त! एका चार्जमध्ये 100 तास चालणारं ब्लूटूथ नेकबँड; नॉन स्टॉप ऐका आवडीची गाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:39 IST2022-05-20T19:39:06+5:302022-05-20T19:39:16+5:30
Just Coseca ब्रँडनं भारतात नवीन Neckband लाँच केले आहेत जे सिंगल चार्जवर 100 तासांपर्यंत म्युजिक प्लेबॅक देऊ शकतात.

जबरदस्त! एका चार्जमध्ये 100 तास चालणारं ब्लूटूथ नेकबँड; नॉन स्टॉप ऐका आवडीची गाणी
ब्लूटूथ इयरफोन्स, इयरबड्स आणि हेडफोन्सची एकच काही गोष्टी युजर्सना खटकतात. त्यातील सर्वात मोठी बाब म्हणजे हे डिवाइस जास्त काळ वापरता येत नाहीत. यांना वारंवार चार्ज करावं लागतं. कधीकधी गाणी ऐकण्याचा मूड असेल किंवा एखादी महत्वाची मिटिंग असेल, अशावेळी ब्लूटूथ इयरफोन्स चार्ज नसतील तर हिरमोड होतो. Just Corseca ब्रँडनं नवीन Neckband सादर केले आहेत, जे सिंगल चार्जवर दीर्घकाळ टिकतात.
Just Corseca Stallion Neckband
Just Corseca Stallion नेकबँड बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. यात तुम्हाला 20Hz-20KHz चा फ्रीक्वेन्सी रिस्पॉन्स मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.0 मिळते. त्यामुळे 15 मीटर पर्यंत दूरवर देखील कनेक्ट होतात. कंपनीनं यात दमदार बॅटरी आणि शानदार साउंड दिला आहे. यात कंपनी अनेक आकर्षक फिचर दिले आहेत.
Just Corseca Stallion ची बॅटरी लाईफ सर्वांचं लक्ष वेधून घेते. या नवीन नेकबँडमध्ये तुम्हाला 800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जवर 100 तासांपर्यंत म्युजिक प्लेबॅक टाइम देते. यात तुम्हाला 70 तासांचा टॉकटाइम आणि 400 तासांचा स्टँडबाय टाइम देखील मिळेल. हा नेकबँड कॅटेगरीमध्ये सर्वात दमदार बॅटरी बॅकअप आहे. हा नेकबँड यूएसबी टाइप-सी पोर्टनं चार्ज करता येतो.
किंमत
Just Corseca Stallion तुम्ही ग्रे आणि ब्लॅक अशा दोन रंगात विकत घेऊ शकता. कंपनीनं या नेकबँड ब्लूटूथ इयरफोन्स सोबत एक वर्षाची वॉरंटी दिली आहे. या नेकबँडची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही याची खरेदी Just Corseca च्या अधिकृत वेबसाईटसह सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सवरून करू शकता.